India Languages, asked by gtp3672, 5 months ago

*शाळा बोलू लागली तर??!मराठी निबंध...​

Answers

Answered by pagareriddhi70
10

Answer:

शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’

एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. शाळेत येणारे प्रत्येक जण विचारतात, ‘माजी विद्यार्थी येतात का? शाळेच्या संपर्कात राहतात का?’ शाळेतलं वयच मुळी गमतीशीर असतं. जीव गुंतलेलाही असतो आणि जीव बाहेर पडण्यास उतावीळही असतो. वयाचा एक देखणा कप्पा. सुखद आठवणींची शिदोरी म्हणजे शाळेचं वय. याच वयात मनावर बरंच काही कोरलं जातं. शाळा मनात असते नि मन शाळेत असतं. एकदा शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाला विचारलं, ‘तुम्हाला शाळा आठवते म्हणजे काय आठवतं?’ मुलं विचारात पडली. असा प्रश्न अनपेक्षित होता. तरी गटातल्या मुलांनी वेगवेगळी मतं नोंदवली, कुणी म्हणालं, आमचे वर्ग आठवतात, आमच्या मित्र-मैत्रिणी आठवतात, काही शिक्षकांचे काही तास आठवतात, शिक्षा केलेली आठवते, कार्यक्रम आठवतात.. असं बरंच काही.

शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. रेंगाळता. कुणाकुणाशी गप्पा मारता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’

पण हे असं तेव्हाच घडतं जेव्हा शाळा वेगळं काहीतरी करते. मुलांनी लक्षात ठेवून तिच्याकडे यावं, तिला भेटावं असं घडतं काही तरी तिथे! याही शाळेचं असंच. कित्येक र्वष झाली पण, मुलं येतात इथं. ही शाळा एका खेडय़ातली. शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. बाकी नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी जातात. सगळ्यांनाच पुढं शिकता येत नाही. पण, आजही या शाळेतली मुलं गावात काही कार्यक्रम असला, सणसमारंभ असला, लग्नकार्य असलं की या शाळेला, इथल्या शिक्षकांना निमंत्रण पाठवतात. मग कसं म्हणता येईल शाळेला मुलं विसरली? उलट मुलांच्या या वागण्याचा शाळेला गर्वच वाटतो.

आज या शाळेत कसली गडबड होती? काय होतं आज सण-समारंभ-जयंती-पुण्यतिथी! काय आहे काय? हॉलमध्ये सगळी तयारी झालेली दिसतेय. फळ्यावर आगत-स्वागताचा बोर्ड लावलाय. काही तरी मोठा कार्यक्रम दिसतोय. कुणालाच अंदाज बांधता येईना. इतक्यात एक गाडी शाळेसमोर थांबली नि शाळेतली मुलं आपणहून सामान उतरवून घ्यायला पुढे आली. बरंच सामान होतं. बांधलेले खोके होते

Explanation:

hope its usefull

Similar questions