History, asked by Krishy2976, 1 year ago

शाळा बोलू लागली तर ? निबंध लेखन

Answers

Answered by roysharanjeet
30

शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’

एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. शाळेत येणारे प्रत्येक जण विचारतात, ‘माजी विद्यार्थी येतात का? शाळेच्या संपर्कात राहतात का?’ शाळेतलं वयच मुळी गमतीशीर असतं. जीव गुंतलेलाही असतो आणि जीव बाहेर पडण्यास उतावीळही असतो. वयाचा एक देखणा कप्पा. सुखद आठवणींची शिदोरी म्हणजे शाळेचं वय. याच वयात मनावर बरंच काही कोरलं जातं. शाळा मनात असते नि मन शाळेत असतं. एकदा शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाला विचारलं, ‘तुम्हाला शाळा आठवते म्हणजे काय आठवतं?’ मुलं विचारात पडली. असा प्रश्न अनपेक्षित होता. तरी गटातल्या मुलांनी वेगवेगळी मतं नोंदवली, कुणी म्हणालं, आमचे वर्ग आठवतात, आमच्या मित्र-मैत्रिणी आठवतात, काही शिक्षकांचे काही तास आठवतात, शिक्षा केलेली आठवते, कार्यक्रम आठवतात.. असं बरंच काही.

शाळा मुलांना म्हणाली, ‘खरंच मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. इतर शाळांचं पाहिलं तर त्यांच्याकडे उत्तीर्ण होऊन गेलेला कुणी विद्यार्थी परतून पाहतही नाही, मग इथे येणं तर सोडाच. तुमचं तसं नाही. तुम्ही इथे येता. रेंगाळता. कुणाकुणाशी गप्पा मारता. असंही ऐकलंय तुमच्यापैकी काही जण तर सतत संपर्कात असतात कुणा शिक्षकांच्या. मला वाटायचं, उडून गेलेली पाखरं परत येतील का? पण तुम्ही येता.. छान वाटतं.’

पण हे असं तेव्हाच घडतं जेव्हा शाळा वेगळं काहीतरी करते. मुलांनी लक्षात ठेवून तिच्याकडे यावं, तिला भेटावं असं घडतं काही तरी तिथे! याही शाळेचं असंच. कित्येक र्वष झाली पण, मुलं येतात इथं. ही शाळा एका खेडय़ातली. शाळेतली फार थोडी मुलं आता गावात राहतात. बाकी नोकरी-धंद्यासाठी बाहेरगावी जातात. सगळ्यांनाच पुढं शिकता येत नाही. पण, आजही या शाळेतली मुलं गावात काही कार्यक्रम असला, सणसमारंभ असला, लग्नकार्य असलं की या शाळेला, इथल्या शिक्षकांना निमंत्रण पाठवतात. मग कसं म्हणता येईल शाळेला मुलं विसरली? उलट मुलांच्या या वागण्याचा शाळेला गर्वच वाटतो.

आज या शाळेत कसली गडबड होती? काय होतं आज सण-समारंभ-जयंती-पुण्यतिथी! काय आहे काय? हॉलमध्ये सगळी तयारी झालेली दिसतेय. फळ्यावर आगत-स्वागताचा बोर्ड लावलाय. काही तरी मोठा कार्यक्रम दिसतोय. कुणालाच अंदाज बांधता येईना. इतक्यात एक गाडी शाळेसमोर थांबली नि शाळेतली मुलं आपणहून सामान उतरवून घ्यायला पुढे आली. बरंच सामान होतं. बांधलेले खोके होते.

Answered by Rohitpatil2511
8

Answer:

रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टीच होती. मी आणि माझे चार-पाच मित्र आम्ही शाळेजवळील चाळीतच राहायचो. त्यामुळे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही सार्वजन शाळेच्या कुंपणावरून उडी मारून शाळेच्या मैदानावरच क्रिकेट खेळायला जायचो. हा रविवार पण असाच होता. आमच क्रिकेट खेळून झालं होतं. खेळून खूप दमलो होतो. म्हणून आम्ही शाळेच्या बंद असलेल्या दरवाजाजवळील पायऱ्यांवर गप्पा मारत बसलो. अचानक एक आवाज आला. “काय विद्यार्थी मित्रांनो, दमलात कि काय?” आम्ही इकडे-तिकडे पाहू लागलो. कोण आवाज देतंय आम्हाला? पण कोणी दिसेनाच. मग पुन्हा आवाज आला. ‘अरे मी शाळा बोलतेय, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं.’ आम्ही आश्चर्यचकित होऊन ऐकू लागलो आणि पुढे शाळा आमच्याशी संवाद साधू लागली.

‘हो विद्यार्थी मित्रांनो,खरंच मी शाळा बोलते. तुमची शाळा. दररोज सकाळी १० वाजता तुमची वाट पाहणारी शाळा. तुम्ही इथे आल्यावर तुमच्या ज्ञानात भर घालणारी शाळा. तुमचा दंगा, मस्ती, हसणं, रडणं सगळं अगदी जवळून पाहणारी शाळा. तुम्ही सांयकाळी घरी जात असताना तुमच्याकडे तक लावून बघणारी शाळा. पुन्हा उद्या सकाळी तुम्ही पुन्हा येणार म्हणून तुमची आतुरतेने वाट बघणारी शाळा. तुमच्याविषयी लळा असणारी शाळा.

बाळांनो, खूप वर्षापासून मी इथेच आहे. सुरुवातीला माझ्याकडे दोनच वर्ग-खोल्या होत्या. तरीही मी आनंदीच होते, कारण माझ्याकडे किती वर्गखोल्या आहेत याचे मला काहीच सुखः किंवा दु:ख नाही. परंतु तुमच्यासारखी गोड मुलं माझ्यासोबत असतात. माझ्या अवतीभोवती खेळतात, बागडतात, अभ्यास करतात, आपलं जीवन घडवतात यातच मला आनंद आहे. सुरुवातीला माझ्यासोबत वीस मुले होती आज मुलांची संख्या साडेपाचशेच्या वर गेली. वर्ग खोल्या दोन च्या वीस झाल्या. शिक्षकांची संख्याही वाढली. एक चे दोन शिपाई झाले. खूप आनंद वाटतो हा प्रवास बघून. खूप चांगले वाईट दिवस या प्रवासात बघायला मिळाले.

माझी नजर सगळ्यांवर असते. अगदी तुमच्यासारख्या गोड मुलांपासून मुख्याध्यापाकापर्यंत आणि मोठ्या अलिशान गाडीतून येणाऱ्या संस्थाचालकापर्यंत सुद्धा. जसा एखाद्या कंटाळवाण्या तासाला तुम्हाला कंटाळा येतो. तसा मलाही तुमचा वर्ग शांत बघून खूप कंटाळा येतो. एखाद्या तासाला तुम्ही खूप हुरहुरीने उत्तरे देता. हे बघून खूप आनंद होतो आणि तुम्हा सर्वांच खूप कौतुकही वाटत. तुम्ही मैदानावर गेल्यावर जेव्हा खूप धम्माल करता, हे पाहून माझाही आनंद गगनात मावत नाही. तुम्हाला नेहमी आनंदी बघायला आवडतं बर का मला.

पण बाळांनो, काही गोष्टींच खूप वाईट वाटतं. जेव्हा तुम्ही माझ्या आवारात कचरा टाकता. तुमच्या वह्यांची पाने फाडून माझ्या वर्गात, मैदानात टाकता. काही मुलं तर थुंकतात माझ्या आवारात आणि सगळा परिसर घाण करतात. जर तुमच्यावर कोणी थुंकला आणि तुमच्या अंगावर कचरा टाकला तर कसं वाटेल तुम्हाला? खूप वाईट वाटेल ना?

म्हणून तुम्हाला एकच सांगायचं. माझीही काळजी घ्या. जशी तुमच्या घराची काळजी घेता अगदी तशीच. तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण?'

एवढं बोलून शाळा रडू लागली. आभाळही दाटून आल होत. थोड्याच वेळात पावसाची रिमझिम सुरु झाली. सगळ मैदान आणि शाळा चिंब भिजली. आम्हीही धावत धावत घाटी आलो. आम्हीही भिजलो होतो. पावसाने कि शाळेच्या अश्रूंनी हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

Similar questions