India Languages, asked by latakoli1006, 9 months ago

शाळा बंद झाल्या तर.... मराठी निबंध

Answers

Answered by manasi12391
35

शाळा बंद झाल्या तर मुलं शिकतील काय.

शाळा बंद झाल्या तर मुलं शिकतील काय.त्या मुलांना या जगाची ओळख कशी होणार.

शाळा बंद झाल्या तर मुलं शिकतील काय.त्या मुलांना या जगाची ओळख कशी होणार.शाळा बंद झाल्या तर मुले शाळेतला आनंद कसा घेणार.

Answered by ItsShree44
71

Answer:

उदया शाळेला सुट्टी आहे' किंवा 'आज अर्ध्या दिवसाने शाळा सुटेल' अशी नोटीस वर्गात आली की वर्गात काय आरडाओरडा सुरू होतो ! सगळ्यांना किती आनंद होतो ! एखादया विदयार्थ्याला वर्गाबाहेर कामासाठी पाठवले, तो एकदम खूश होतो. शाळेपासून दूर जायला मिळते, याचाच हा आनंद ! काही काही मुले तर शाळेत जायच्या वेळेला काहीतरी बहाणे करतात. काहीजण तर चक्क रडतात ! असे आहे, तर मग शाळा बंदच का करू नयेत? शाळा नसत्याच तर... शाळा बंद झाली तर मुलांच्या वाट्याला मुक्त जीवन येईल. मनाला लागेल ते खावे, प्यावे, नाचावे, बागडावे, आरडाओरडा करावा... त्यांना कोणी अडवणार नाही !

शाळेतील काही गोष्टी त्रासदायक वाटल्या तरी 'रग्य ती शाळा' हेच खरे ! शाळेत जिवाभावाचे सोबती जोडले जातात. मित्रांच्या संगतीत नाना मनोराज्ये रंगवली जातात. साहस करण्यासाठी शाळा आणि शाळकरी मित्र आवश्यकच असतात. शाळेतील स्नेहसंमेलने, त्यांत रंगवलेली नाटके, शाळेत केलेली इतर धमाल, शाळेतील सहली, श्रमदानांचे कार्यक्रम आणि त्यानंतर श्रमपरिहाराची भोजने, क्रीडास्पर्धा, बक्षीस समारंभ या साऱ्या गोष्टी शाळा बंद पडल्या तर अनुभवायला मिळणार नाहीत.

शाळा म्हटली की चुरशीच्या स्पर्धा आल्या. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल- कोणताही सामना असा रंगतो की, सामना संपला तरी पुढे महिनोन्महिने त्याबाबतच्या आठवणींची उजळणी होते. शाळा बंद पडल्या तर मग असे सामने कसे बरे रंगणार?

शाळा ही विदयार्थ्यांची माता असते. अनेक कडू-गोड आठवणी विदयार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात जमा केलेल्या असतात. शाळेमध्ये शिकताना फार मोलाचे संस्कार त्यांच्या मनावर उमटलेले असतात. म्हणून माणूस पुढे कितीही मोठा झाला, तरी तो आपल्या शाळेला विसरू शकत नाही. म्हणूनच शाळा नसत्या तर माणसाचे नक्कीच मोठे नुकसान झाले असते. किंबहुना माणूस स्वत:चे माणूसपण गमावून बसला असता.

Similar questions