India Languages, asked by 67sachithakur, 8 months ago

शाळेचे आत्मकथन in marathi

Answers

Answered by borhaderamchandra
6

Explanation:

मी मराठी शाळा बोलतेय हे ऐकून तुम्हाला नवलच वाटेल; पण ते खरे आहे. आज माझा सयंम संपला आहे. मी निमुटपणे सर्व सहन करत आले; पण मला आता राहवत नाही. माझ्यावरचा अन्याय मी सहन करणार नाही. माझ्या विचारांचा आता उद्रेक झाला आहे. माझे विचार ज्वालामुखी सारखे रौद्र रूप धारण करत आहे. याचे कारण माझ्यावर केलेले खोटे आरोप, बदनामी होय. माझ्यामुळे चांगले शिक्षण मिळत नाही. पाल्याचे भवितव्य धोक्यात आहे असा अपप्रचार केला जात आहे. माझ्यावरील हे सारे आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. माझा अपप्रचार करण्यामागे काही स्वार्थी लोकांचा, धनिक लोकांचा मला संपविण्याचा डाव आहे.त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. पण मी घाबरणार नाही. मी तुमच्यासाठी अजूनही खंबीर उभी आहे. पूर्वीचे स्वरुप मी काळानुरूप बदलत आहे. चांगल्या शिक्षणासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्ही मुळीच घाबरून जाऊ नका. मराठी शाळेत आल्यावर तुम्हाला हमखास सरकारी नोकरी मिळणार आहे. मी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधत आहे. नियम, संस्कार,शिस्त, मूल्ये फक्त मराठी माध्यमांच्या शाळेतच मिळणार आहे. चांगला पाल्य आदर्श नागरिक घडणार आहे.शास्रज्ञ, डॉक्टर,इंजिनियर, न्यायाधिश तर माझ्याच कुशीत शिकले व आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तीवंत आहेत. आपल्या संतांची भाषा कोणी शिकविली?माझ्यातील गुणवत्ता व महत्त्व थोडेही कमी झालेले नाही.मला फक्त आवशकता आहे तुमच्या सहकार्याची व एकीची. तरच मी जीवंत राहील.

तुमचे सहकार्य असेल तर मी नव्या जोमाने माझे काम सुरु करेल. सरकारी शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ताकतीसह पोहचवेल. मी आता डिजिटल झालेले आहेत. माझ्या कितीतरी शाळांतुन मी डिजिटल शिक्षण देत आहे. त्यासाठी प्रोजेक्टरची व्यवस्था केलेली आहे. अध्यापन व अध्ययन प्रोजेक्टर वर शिकविले जाते. हे कार्य खेड्यात व शहरात चालू आहे. खाजगी शाळां- पेक्षाही माझी ताकत वाढली आहे. सर्व जाती, धर्म, भाषेच्या पालकांनी मराठी शाळेत प्रवेश घ्यावा. तुमच्या पाल्याचे भले होणारच. तुमच्या पाल्यांच्या सुप्त गुणांना हमखास वाव मिळणार आहे. तुमची चिंता मला आहे. कर्ज काढून जगू नका. डोनेशन,फी भरू नका.चांगले शिक्षण देण्याचे तुम्हांला आजच वचन देत आहे. त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. मी तुमच्या पाल्यांसाठी सरकारी निधितून सुंदर इमारती, मैदाने साकारली आहे. त्यात आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शौचालय, पाणी, पोषण आहार, स्कॉलरशिप अशा शासकीय सेवा चालू केल्या आहेत. आपली मानसिकता बदलून सरकारी शाळांचा लाभ घ्या. मीच तुमचे स्वप्न साकार करणार आहे

Similar questions