शाळेची घंटा आत्मकथन निबंध
Answers
Answer:
आपण आपल्या जीवनाचे बारा वर्षे शालेय जीवनात घालवले. या वर्षांत आपण खूप काही कमावले आणि बरेच काही गमावलेही. आपल्या शाळेच्या कडू गोड प्रसंगांवर वेगळ्या नजरेने बघून त्याला प्रकाशझोतात आणण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न. मला नक्की खात्री आहे की या अनुभवांतून आपल्यासही आपले बालपण आणि त्या गमती जमती आठवतील.
शाळा, शाळेचा बाक, फळा, रंगीत चित्रांनी सजलेली शाळेची भिंत, सुविचार, परीक्षा, स्पर्धा, बालदरबार, परिपाठ, गृहपाठ, सहल, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, शिक्षा, वक्तृत्व स्पर्धा, शिपाई काका, ग्रंथालय, संगणक विभाग, प्रयोगशाळा, वाढदिवस, गणवेश, सण, दिवाळीची वही, ऑफ पिरेड, स्काउट-गाईड, डबा, हस्तलिखित, मातृदिन, शिक्षक दिन, बालदिन, प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिन. प्रार्थना, कलिंगड आणि आंबे डाळ, मराठीचे भन्नाट निबंध आणि इंग्रजीचे अजब स्पेलिंग. गणिताची सूत्रे व इतिहासातील क्लिष्ट सनावळ्या, संस्कृत मधील सुभाषिते आणि हिंदीचे व्याकरण त्याच बरोबर सर्वात महत्वाची "शाळेची घंटा".
या सर्वांचा विचार तुमच्या डोक्यात आला असणारच. तर उजळूवया जुन्या आठवणी आणि भरवूया आपल्या मनात आपलीच शाळा.