शाळेचा क्रीडाविभागासाठी खेळाची साहित्याची मागणी पत्र
Answers
औपचारिक पत्र
★ योग्य प्रश्न :
शाळेच्या क्रीडाविभागासाठी खेळाच्या साहित्याची मागणी करणारे पत्र
उत्तर :
दिनांक - 18 जून 2021
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
चॅम्पियन स्पोर्ट्स
759/52, फर्ग्युसन कॉलेज रोड
डेक्कन जिमखाना
पुणे - 411004
विषय : क्रीडा साहित्याची मागणी करणे बाबत
महोदय,
मी गौरी देशमुख सिम्बॉयसिस स्कूलची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहीत आहे की आमच्या शाळेमध्ये असणाऱ्या क्रीडा विभागामध्ये क्रीडा साहित्याची गरज आहे. आवश्यक असणारे क्रीडा साहित्य आपल्या दुकानात उपलब्ध आहे. त्या साहित्याची मागणी करण्यासाठी मी आपणास माननीय मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन पत्र लिहिते.
आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्याची यादी पुढीलप्रमाणे आहे -
- 1). फुटबॉल - 5 नग
- 2). टेनिस बॉल - 15 नग
- 3). क्रिकेट बॅट - 6 नग
- 4). उड्या मारणासाठी लागणाऱ्या दोऱ्या - ८ नग
- 5). हॉलीबॉल - 5 नग
वरील यादीत दिलेले सामान आपण तातडीने तसेच योग्य स्थितीमध्ये उपलब्ध करून द्याल ही आशा.
दरवेळेस आपल्या दुकानातून शालेय क्रीडा साहित्य खरेदी करताना आपण योग्य ती सवलत देता यावेळेसही आपण ते सर्व साहित्य योग्य दरात उपलब्ध करून द्याल ही अपेक्षा क्रीडा साहित्याचे पैसे पाठविण्यासाठी आपण आपला बँकेचा तपशील शाळेच्या पत्त्यावर पाठवावा.
आपली विश्वासू ,
गौरी देशमुख
(विद्यार्थी प्रतिनिधी)
सिम्बॉयसिस स्कूल,
डेक्कन जिमखाना
पुणे - 411004
संपर्क क्रमांक - 020-12345678