India Languages, asked by DevBodhare, 4 months ago

शाळेची सहल एखाद्या ............मध्ये न्यायचा हट्ट विद्यार्थ्यांनी शिक्षकांजवळ धरला.​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

बालपण आठवले की, आपल्याला आठवते ती शालेय सहल. लहानपणी शाळा मुलांना डबे घेऊन जवळचा एखादा डोंगर, नदी, तलाव या ठिकाणी एका दिवसाची सहल घेऊन जायचे. त्यावेळी मुले खेळून, बागडून, सहभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदाने घरी परतायची. तो आनंद अवर्णनीय असा असायचा. शाळांच्या लांबच्या सहलीसुद्धा प्रेक्षणीय असायच्या. त्यातून मुलांना आनंद आणि माहिती मिळण्याबरोबर राज्याच्या पर्यटन व्यवसायात सुद्धा वृद्धी होत असे.

आता ऐतिहासिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, गडकिल्ले, समुद्रकिनारे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये, कारखाने अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात. आता हा ट्रेंडसुद्धा बदलत आहे. शाळांच्या सहली वॉटर पार्क, समुद्रकिनारी काढल्या जात आहेत. आता याचे अनुकरण छोट्या शहरातील शाळादेखील करू लागल्या आहेत. हा नवा ट्रेंड पर्यटनवाढीसाठीसुद्धा उपयुक्त ठरत आहे. यामुळे मुलांना नवनवीन ठिकाणे पाहायला मिळण्याबरोबरच राज्यात पर्यटन वाढीला मदत होत आहे. शैक्षणिक सहली पूर्वीपासून विविध ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक किंवा औद्योगिक संकुले, कारखाने, वस्तुसंग्रहालये, गडकिल्ले, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे आदी ठिकाणी नेल्या जातात. याबाबत विद्यार्थ्यांनादेखील उत्सुकता निर्माण होते. पुस्तकात वाचत असलेले स्थळ समोर पाहताना विद्यार्थ्यांची उत्सुकता जागी होते.

ऐतिहासिक स्थळांमधून प्रेरणा मिळते, इतिहास माहिती होतो किंबहुना ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरून तरळून जातात. कारखान्यात कोणती वस्तू कशी बनते, हे पाहताना विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण होते. अशा शैक्षणिक सहलींमधून मुलांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पडते. सहलींद्वारे आपल्या सवंगड्यांसह पर्यटनाचा आनंद लुटता येतो. त्यामुळे विद्यार्थीही सहल म्हटल्यावर जाम खूश असतात. आजही अनेक ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा कल हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याकडेच अधिक प्रमाणात आहे. सहलीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळतो. मुक्कामाच्या ठिकाणी सांस्कृतिक सादरीकरण केले जाते. त्यातून मुलांना आनंद मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये एकोपा वाढतो, जवळीक वाढते व त्यांच्या कलागुणांना सादरीकरणासाठी एक व्यासपीठही मिळते. यामुळे आता या सहली विद्यार्थ्यांच्या मौजमजेच्या होत चालल्या आहेत. शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून पूर्वपरवानगी काढणे गरजेचे असते. त्या परवानगीनंतर सहलीची जबाबदारी ही त्या शाळेची असते. ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी, शाळा आर्थिक विवंचनेला तोंड देत सहलींचे आयोजन करतात. सहलींचा बदलता ट्रेंड पाहता सहली काढताना शाळांकडे पुरेसा कर्मचारीवर्ग देखील उपलब्ध नसतो. एका सहलीमध्ये अनेक मुलांचा समावेश असतो, मात्र त्या मानाने शिक्षकांची संख्या कमी असते. त्यामुळे सहली काढताना पुरेसा शिक्षक व कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शाळांकडून सहली काढताना खासगी वाहनांचा तसेच एसटी बसेसचा वापर केला जातो. महाराष्ट्र ही ऐतिहासिक, सांस्कृतिक भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक राजे, संत, विचारवंत, वैज्ञानिक, लेखक घडले आहेत. अशा महाराष्ट्रात गडकिल्ले, पुरातन मंदिरे, तलाव, लेणी, ब्रिटिशकालीन वास्तू, समुद्रकिनारे, संग्रहालये, लेण्या, जंगले आदी मोठ्या प्रमाणात आहेत.

राज्य शासन व केंद्र शासनाने अलीकडे पर्यटनवाढीवर मोठा भर दिला आहे. त्यासाठी दोन्ही शासनांनी स्वतंत्र पर्यटन विभाग सुरू केले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळही राज्याच्या पर्यटन वाढीत महत्त्वाचे योगदान देत आहे. शैक्षणिक सहली काढताना पर्यटन विकास महामंडळाचे संकेतस्थळ पाहिल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल. राज्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांची माहिती त्यावर उपलब्ध आहे. शिवाय तिथे कसे पोहोचायचे याचीही माहिती आहे. कुठेही शालेय सहली नेताना शिक्षकांनी त्या स्थळांचा अभ्यास करणे व विद्यार्थ्यांना त्याची पूर्व माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपण नेमके काय पाहणार आहोत याची विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना मिळते व ते त्या त्या स्थळाविषयी अधिक माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करतात. शिवाय त्या त्या स्थळावर गेल्यानंतर पूर्वमाहिती असल्याने अधिकची माहिती मिळविण्यातही त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने सहलींचे नियोजन केल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात मोठा फायदा होऊ शकतो. सहली ही ज्ञानवाढीची एक सुवर्णसंधी असते. यामुळे पर्यटनवाढ व रोजगार निर्मितीही होते. त्यामुळे सहलीची सुवर्णसंधी शालेय विद्यार्थ्यांनी साधणे गरजेचे आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना आर्थिक तरतूद करून मुलांना सहलींवर पाठवावे. शिक्षकांनी सहलींचे अभ्यासपूर्ण नियोजन करावे. असे नियोजनबद्ध नियोजन केल्यास शैक्षणिक सहली या विद्यार्थ्यांच्या ज्ञान वाढीच्या कार्यात महत्वाचे योगदान देऊ शकतात.

Explanation:

Mark me brainliest

Answered by abilshaikh
1

Answer:

its not a ans ok

Explanation:

please marks brai list

Similar questions
Math, 9 months ago