शाळे च्या मुख्याध्यापकाांना गणेशोत्सवासाठी गावीजायचेअसल्याकारणानेआठ दिवसाची रजा मांजूर व्हावी या साठी दवनांती करणारेपत्र दलहा .
Answers
Answered by
4
पत्र लेखन
Explanation:
आठ दिवसांची रजा मिळण्याबाबत मुख्याध्यापकाला विनंती पत्र:
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
सेंट मेरी स्कूल,
सातारा.
विषय: आठ दिवसांची रजा मिळण्याबाबत.
माननीय महोदय,
मी,नीतेश पाटील, आपल्या शाळेमध्ये इयत्ता दहावी- अ चा विद्यार्थी आहे. हे पत्र लिहिण्यामागचे कारण असे की, मला आमच्या गावी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आठ दिवसांसाठी जायचे आहे. त्यामुळे, मला दिनांक ६ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर पर्यंत सुट्टी हवी आहे.
कृपया करून मला या आठ दिवसांची रजा मंजूर करावी, अशी मी विनंती करतो. मी तुम्हाला आश्वासन देतो की मी माझा राहिलेला संपूर्ण अभ्यास परत आल्यावर नक्की पूर्ण करेन.
धन्यवाद!
आपला विश्वासु,
नीतेश पाटील.
इयत्ता दहावी-अ
दिनांक : ४ ऑक्टोबर, २०२१
Similar questions