India Languages, asked by ANISH987, 1 year ago

शाळेच्या स्नेह संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा ​

Answers

Answered by halamadrid
97

■■शाळेच्या स्नेह संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारे पत्र■■

राकेश म्हात्रे,

रामनगर,

छत्रपती स्कूल,

डोंबिवली.

दिनांक : २९ जून, २०२०.

प्रति,

माननीय महापौर,

कल्याण डोंबिवली महानगर पालिका.

विषय : शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबाबत .

महोदय,

मी राकेश म्हात्रे, छत्रपती स्कूलचा विद्यार्थी प्रमुख या नात्याने तुम्हाला हे पत्र लिहत आहे. मी आपणास या पत्राद्वारे विनंती करतो की, आपण आमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून येण्याची कृपा करावी. हा कार्यक्रम, ३ जुलै, २०२० रोजी दुपारी ३ वाजता आमच्या शाळेत होणार आहे.

या कार्यक्रमात क्रीडा व अभ्यासात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे सन्मान तुमच्या हातांनी व्हावे असे आम्हाला वाटते, जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल.

मी आशा करतो की, तुम्ही कार्यक्रमात येऊन विद्यार्थ्यांना उपकृत कराल.

आपला विश्वासु,

राकेश म्हात्रे.

(विद्यार्थ्यी प्रतिनिधी)

Answered by MANASZOPE
0

Answer:

0id2 0jdw 0jwbd0jbwx0xw je0xu wx0j

Explanation:

0j d0j j0d 0j wxj 0xw 0jxw 0jxw 0jx w

Similar questions