Hindi, asked by satishkhamkar1977, 2 months ago

शाळा नसते तर .... निबंध लिहा

Answers

Answered by raginikumari2308
0

Answer:

0शाळा नसते तर .... निबंध लिहा

Answered by pallavijagtap434
5

Answer:

शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील जडणघडणीचा पहिला पाया आहे. शाळा आहे म्हणून सर्व काही आहे. जर शाळा नसती तर मानव आपल्या आयुष्यात उंच झेप घेऊ शकला नसता. त्याच्या आयुष्यात इतकी प्रगती करु शकला नसता. शाळा नसती तर मानव चंद्रावर जाऊच शकला नसता.

शाळा नसती तर मानवाला पडणारे भौतिकशास्त्रातील, रसायनशास्त्रातील, गणितशास्त्रातील प्रश्न सुटलेच नसते. शाळा नसती तर विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्याच नसत्या. जगामध्ये सर्व देश आश्चर्यकारक प्रगती करू शकले नसते. शाळा नसती तर खऱ्या अर्थाने जगण्याचा मानवाला अर्थच कळाला नसता.

आज आपण पाहतो मानवाने आपल्या जीवनात विज्ञानाच्या साह्याने खूप प्रगती केली आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवाने असंख्य नवे शोध लावून आपले जीवन सुखकर केले आहे. मोटारी, विमाने, कंप्यूटर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा शोध लावून मानवाने आपल्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे. हे सर्व मानवाला केवळ शाळेमुळे शक्य झाले आहे.

माणसाला जगण्यासाठी दैनंदिन जीवनामधील आकडेमोड करण्यासाठी, हिशोब ठेवण्यासाठी, संदेश वाचण्यासाठी मूलभूत ज्ञानाची गरज असते. हे सर्व ज्ञान मानवाला शाळेतूनच मिळते. शाळा नसती तर या जगामध्ये झालेली डिजिटल क्रांती आपणास पहावयास मिळाली नसती. डिजिटल भाषा, कोडिंग भाषा, यांचा शोध लागला नसता.

Shala Nasti Tar Marathi Nibandh

कंप्यूटर ने केलेली आश्चर्यकारक प्रगती, मार्केटमध्ये येणारे आधुनिक तंत्रज्ञानाचे अविष्कार, नवनवीन सॉफ्टवेअर, हार्डवेअर आपल्याला शाळा नसती तर पहायला मिळाले नसते. शाळा नसती तर देशामध्ये, जगामध्ये, तज्ञ कामगार, डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी घडलेच नसते.

शाळा नसती तर आपले राज्य, आपला देश विज्ञान, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र या क्षेत्रामध्ये प्रगती करु शकला नसता. शाळा नसती तर आपण येणाऱ्या नव्या पिढीला सुद्धा घडवू शकलो नसतो. सुंदर बालपणाचा आनंद हा आपल्याला शाळेत मिळतो, कारण शाळेत आपले खरे खेळसवंगडी असतात.

गुरुजींचे प्रेम, मित्रांचे प्रेम हे आपणास शाळेतच मिळते. लहान असताना शाळेत जाण्यापूर्वी आई आपणास शाळेत जाण्यासाठी तयार करते, आपले केस विंचरते, आपल्याला कपडे घालते, आपला जेवणाचा डबा बनवते आणि चॉकलेट साठी पप्पा पैसे देतात. हे सर्व प्रेम आपणास शाळा नसती तर मिळालेच नसते.

शाळा नसती तर निबंध लिहण्यासाठी शब्दसुद्धा सुचले नसते. शाळेचे मानवाच्या जीवनात खूप मोठे योगदान आहे, शाळेमुळे माणूस कमी वयामध्ये सुज्ञ, समजूतदार बनतो शाळा शिकलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात निर्णय घेताना कधीच चुकत नाही.

शाळा शिकलेली व्यक्तीच्या अंगी दूरदृष्टी निर्माण होते. शाळा शिकलेल्या व्यक्तींना भविष्यात येणार्‍या अडचणींची, संकटाची चाहूल सर्वात अगोदर लागते. शाळेचे असे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे शाळेची मानवाच्या आयुष्यातील भूमिका खूप महत्त्वाची आहे.

शाळा आहे तर आयुष्य आहे! शाळा आहे तर भविष्य आहे!

Similar questions