Hindi, asked by mithilesh4078, 9 months ago

शाळा नसत्या तर मराठी निबंध

Answers

Answered by prabhakar222ps
2

Answer:

शाळा नसतील तर.......

        गणिताचा रट्टाळ तास सुरू होता. गणितं पूर्ण करत असतानाच सोपानदादा सूचना घेऊन आल्याने आख्खा वर्ग हेऽऽऽऽऽऽऽ’ करून ओरडला. बाईंनी सांस्कृतिक कला मंचा’च्या निबंध स्पर्धेसाठीचे विषय वाचून दाखवले. त्यातला एक विषय ऐकून तर सगळे अजूनच चेकाळले.---कारण विषयच तसा होता---" शाळा नसतील तर---!"

    विषय ऐकूनच मी मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं की, आपण स्पर्धेत भाग घ्यायचाच.’ कारण रोज सकाळी डोळे चोळत लवकर उठताना मनात येतंच---शीः! कशाला ही शाळा?’ निदान आमचे निबंध वाचून तरी शाळा-प्रकरण बंदच करायचं शहाणपण कुणाला सुचलं तर फारच छान होईल असंही मला वाटलं. याचा आणखी एक फायदा म्हणजे निबंधाचे मुद्दे काढण्यासाठी कुणाचीही मदत घ्यायला नको! कारण सगळे माझ्याच मनातले मुद्दे!

    मी शाळा बंद झाल्याच्या थाटात आनंदाने उड्या मारत घरी गेले आणि एका कागदावर कच्चे मुद्दे काढायला सुरुवात केली. शाळा नसतील तर---तर---तर--- कित्ती बरं होईल! लवकर उठायला नको, उशीर झाल्यामुळे होणारी शिक्षा नको, शिस्त नको,अभ्यास नको, जड जड दप्तरं नकोत, नावडते विषय नकोत, घरच्या अभ्यासासाठी घरच्यांची कटकट नको, निकालाचं दडपण नको, स्पर्धा नकोत, इतर उपक्रम नकोत---अरेच्या! डोक्याला नस्ता ताप देणार्याझ या सगळ्याच गोष्टी निकालात निघतील. मग काय? हातात वेळच वेळ!! मला हवं ते करायला रान मोकळंच होईल!

    या ‘मोकळ्या राना’त स्वच्छंद बागडताना मी काय काय बरं करेन?

मला  सकाळी उशिरापर्यंत झोपता येईल. भरपूर खेळता येईल. मनमुराद सायकल चालवता येईल.अवांतर वाचन तासन्‍ तास करता येईल. टी.व्ही. भरपूर पाहता येईल. मनात येईल तेव्हा माझी लाडकी हार्मोनियम काढून कितीही वेळ वाजवता येईल. माझे इतर छंदही मनसोक्त पुरवता येतील. हस्तकला, चित्रकला, मातीकाम, रंगकाम असेही वेगळेच छंद जोपासता येतील. वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येईल. कविता रचता येतील. गोष्टी लिहिता येतील. वेगळ्या नावीन्यपूर्ण कला शिकता येतील.

    एरवी शाळेच्या परिपाठाच्या वेळी मी हार्मोनियमवर राष्ट्रगीत आणि प्रार्थना वाजवते. परिपाठाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांमध्ये मला हार्मोनियम वाजवायची संधी मिळते. शाळेत होणार्याई ‘जनरल नॉलेज’ च्या स्पर्धेमध्ये मी केलेलं अवांतर वाचन खूपच उपयोगी पडतं. मी पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा आनंद, मी शिकलेल्या कला माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींशी आणि शिक्षकांशी ‘शेअर’ करता येतात.मी या गोष्टी करीन तर खरं, पण त्यांचा घेतलेला आनंद मी कुणाशी शेअर करू? वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर कधीकधी बक्षिसं मिळतात, तेव्हा घरातून कौतुक होतंच, पण शाळेतल्या बाईही कौतुकाची थाप पाठीवर देतात.(शिवाय शाळेतल्या मित्र-मैत्रिणींमध्येही कॉलर ताठ करून मिरवता येतं.) आता हेच पाहा ना! ‘सांस्कृतिक कला मंचा’च्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या सूचना शाळा नसत्या तर कुठून मिळाल्या असत्या?

    अभ्यास नाही म्हणून परीक्षाही नाहीत. शालेय जीवनातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे १०वी ची शालान्त परीक्षा. जर ही परीक्षाच दिली नाही तर कॉलेजमध्ये प्रवेश  कसा मिळेल? आणि जर कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं नाही, तर नोकरी कुठून मिळेल? नोकरी नसेल तर, आपला उदरनिर्वाह कसा होईल?

    आम्हाला चांगल्या सवयी लावणं, शिस्त लावणं, एक चांगला नागरिक बनवणं हे काम घरी आई-वडील करतात. आणि शाळेत शिक्षक! संस्कारधनाचे कण वेचण्यासाठीचं आमचं दुसरं घर म्हणजे शाळाच नव्हे का?

    आधी शाळा नसतील तर---’ या विचारानेच मला खूप आनंद झाला होता. पण हळूहळू माझ्याच लक्षात आलं की शाळा म्हणजे फक्त न आवडणार्याठ गोष्टींची लांबलचक यादी नाही, तर ज्यांचं वर्णनही करता येणार नाही अशा कितीतरी गोष्टी त्यात सामावलेल्या आहेत. शाळा नसतील तर खूप काही चांगल्या गोष्टी करू शकू हे खरं, पण ज्या गोष्टी फक्त शाळाच आम्हाला देऊ शकते, त्या सगळ्या गोष्टींना आम्ही मुकू.

    तेव्हा शाळा नसतील तर आपण खूप आनंद घेऊ शकू हे खूळ डोक्यातून काढून टाकून नव्या उमेदीने शाळेचा आनंद मनमुराद लुटू या आणि इतरांनाही तो लुटू देऊ या.

Answered by ItsShree44
1

Answer:

आम्ही दहावीत आलो तेव्हा आमच्या शाळेने एका प्रकल्पात भाग घेतला होता. प्रकल्प एका संस्थेने सुरू केला होता. 'शाळा तुमच्या दारी.' आदिवासी वस्तीत जाऊन तेथील मुलांना शिकवायचे. आम्हीपण आमच्या सरांबरोबर आठ दिवस तेथे गेलो होतो. त्या मुलांना शिकवताना मला खूप गंमत वाटली. मी त्यांना काही कविता शिकवल्या आणि नंतर कातरकाम करून कागदांतून काही आकृती बनवायला (ओरीगामी) शिकवल्या. प्रथम थोडा वेळ लागला; पण नंतर त्यांना भराभरा जमू लागले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता. तेव्हाच माझ्या मनाने निर्णय घेतला की, आपण शिक्षक व्हायचे!

आपल्या संस्कृतीत तीन प्रकारची ऋणे सांगितली आहेत. त्यांपैकी एक आहे 'ऋषिऋण' म्हणजे गुरूचे ऋण, गुरूचे ऋण कसे फेडायचे? तर गुरूकडून आपल्याला जे काही ज्ञान मिळाले, विदया मिळाली ती आपण दुसऱ्याला दयायची. मी शिक्षक झालो, तर मी माझ्या गुरुजींच्या ऋणातून काही अंशांनी तरी मुक्त होऊ शकेन. मी शिक्षक झालो तर...? याबाबत जेव्हा मी विचार करू लागतो, तेव्हा माझे अनेक शिक्षक माझ्या मनःचक्षूसमोर उभे राहतात. मला आठवतात माझ्या पूर्वप्राथमिक शाळेतील 'ताई'. आमच्यासाठी त्या किती धडपडत असत. आम्हांला गाणी, गोष्टी शिकवत. आम्ही कितीही दंगा केला तरी त्या आमच्यावर कधी रागावत नसत. नंतर प्राथमिक व माध्यमिक शाळेत आमच्यासाठी कष्ट घेणारे शिक्षक आठवले. आमचे हस्ताक्षर चांगले व्हावे, आम्हाला वाचनाची गोडी लागावी, आमच्यात सभाधीटपणा यावा, म्हणून सतत धडपडणारे शिक्षक आठवले. इंग्रजी भाषेत आपण बिनचूक, अस्खलित बोलावे, म्हणून धडपडणारे सर, गणितात आम्ही प्रवीण व्हावे, म्हणून झटणारे गुरुजी डोळ्यासमोर आले. साने गुरुजी, लोकमान्य टिळक, प्राचार्य गोपाळराव आगरकर या आदर्श शिक्षकांविषयीच्या वाचलेल्या हकिकती

आठवल्या. मी शिक्षक झालो तर आदर्श शिक्षक होण्याचाच यत्न करीन. त्यासाठी मी माझ्या विषयांत निपुण होईन. शिक्षक हा सदैव विदयार्थी असला पाहिजे. त्याने सदैव आपल्या विषयाचे अध्ययन केले पाहिजे. काही शिक्षक खूप हुशार असतात, तज्ज्ञ असतात. पण ते विदयार्थ्यांपर्यंत आपले ज्ञान नीट पोहोचवू शकत नाहीत. मी शिक्षक झालो, तर मी माझा विषय विदयार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवीन. शिकणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टींत रस निर्माण झाला पाहिजे. आपला विषय विद्यार्थ्यांना 'बोअर' होणार नाही याची शिक्षकाने काळजी घेतली पाहिजे. किंबहुना हसतखेळत अध्यापन हे कसब मी साध्य करून घेईन. वर्गातील हुशार विदयार्थ्याला जेवढी गोडी वाटेल, तेवढीच गोडी वर्गातील सुमार विद्यार्थ्याला वाटली पाहिजे, तरच मी यशस्वी शिक्षक ठरेन, मला केवळ विषय शिकवायचा नाही, तर माझ्यासमोरच्या विदयार्थ्याचे व्यक्तिमत्त्व मला घडवायचे असेल. तेच माझे ध्येय असेल.

Similar questions