शाळा नसत्या तर मराठी निबंध.......
Please Answer
Answers
शाळा नसतील तर.......
गणिताचा रट्टाळ तास सुरू होता. गणितं पूर्ण करत असतानाच सोपानदादा सूचना घेऊन आल्याने आख्खा वर्ग हेऽऽऽऽऽऽऽ’ करून ओरडला. बाईंनी सांस्कृतिक कला मंचा’च्या निबंध स्पर्धेसाठीचे विषय वाचून दाखवले. त्यातला एक विषय ऐकून तर सगळे अजूनच चेकाळले.---कारण विषयच तसा होता---" शाळा नसतील तर---!"
विषय ऐकूनच मी मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं की, आपण स्पर्धेत भाग घ्यायचाच.’ कारण रोज सकाळी डोळे चोळत लवकर उठताना मनात येतंच---शीः! कशाला ही शाळा?’ निदान आमचे निबंध वाचून तरी शाळा-प्रकरण बंदच करायचं शहाणपण कुणाला सुचलं तर फारच छान होईल असंही मला वाटलं. याचा आणखी एक फायदा म्हणजे निबंधाचे मुद्दे काढण्यासाठी कुणाचीही मदत घ्यायला नको! कारण सगळे माझ्याच मनातले मुद्दे!
मी शाळा बंद झाल्याच्या थाटात आनंदाने उड्या मारत घरी गेले आणि एका कागदावर कच्चे मुद्दे काढायला सुरुवात केली. शाळा नसतील तर---तर---तर--- कित्ती बरं होईल! लवकर उठायला नको, उशीर झाल्यामुळे होणारी शिक्षा नको, शिस्त नको,अभ्यास नको, जड जड दप्तरं नकोत, नावडते विषय नकोत, घरच्या अभ्यासासाठी घरच्यांची कटकट नको, निकालाचं दडपण नको, स्पर्धा नकोत, इतर उपक्रम नकोत---अरेच्या! डोक्याला नस्ता ताप देणार्याझ या सगळ्याच गोष्टी निकालात निघतील. मग काय? हातात वेळच वेळ!! मला हवं ते करायला रान मोकळंच होईल!
या ‘मोकळ्या राना’त स्वच्छंद बागडताना मी काय काय बरं करेन?
Hope it will help ⛎
Answer:
उदया शाळेला सुट्टी आहे' किंवा 'आज अर्ध्या दिवसाने शाळा सुटेल' अशी नोटीस वर्गात आली की वर्गात काय आरडाओरडा सुरू होतो ! सगळ्यांना किती आनंद होतो ! एखादया विदयार्थ्याला वर्गाबाहेर कामासाठी पाठवले, तो एकदम खूश होतो. शाळेपासून दूर जायला मिळते, याचाच हा आनंद ! काही काही मुले तर शाळेत जायच्या वेळेला काहीतरी बहाणे करतात. काहीजण तर चक्क रडतात ! असे आहे, तर मग शाळा बंदच का करू नयेत? शाळा नसत्याच तर... शाळा बंद झाली तर मुलांच्या वाट्याला मुक्त जीवन येईल. मनाला लागेल ते खावे, प्यावे, नाचावे, बागडावे, आरडाओरडा करावा... त्यांना कोणी अडवणार नाही !
शाळेतील काही गोष्टी त्रासदायक वाटल्या तरी 'रग्य ती शाळा' हेच खरे ! शाळेत जिवाभावाचे सोबती जोडले जातात. मित्रांच्या संगतीत नाना मनोराज्ये रंगवली जातात. साहस करण्यासाठी शाळा आणि शाळकरी मित्र आवश्यकच असतात. शाळेतील स्नेहसंमेलने, त्यांत रंगवलेली नाटके, शाळेत केलेली इतर धमाल, शाळेतील सहली, श्रमदानांचे कार्यक्रम आणि त्यानंतर श्रमपरिहाराची भोजने, क्रीडास्पर्धा, बक्षीस समारंभ या साऱ्या गोष्टी शाळा बंद पडल्या तर अनुभवायला मिळणार नाहीत.
शाळा म्हटली की चुरशीच्या स्पर्धा आल्या. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल- कोणताही सामना असा रंगतो की, सामना संपला तरी पुढे महिनोन्महिने त्याबाबतच्या आठवणींची उजळणी होते. शाळा बंद पडल्या तर मग असे सामने कसे बरे रंगणार?
शाळा ही विदयार्थ्यांची माता असते. अनेक कडू-गोड आठवणी विदयार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात जमा केलेल्या असतात. शाळेमध्ये शिकताना फार मोलाचे संस्कार त्यांच्या मनावर उमटलेले असतात. म्हणून माणूस पुढे कितीही मोठा झाला, तरी तो आपल्या शाळेला विसरू शकत नाही. म्हणूनच शाळा नसत्या तर माणसाचे नक्कीच मोठे नुकसान झाले असते. किंबहुना माणूस स्वत:चे माणूसपण गमावून बसला असता.