शाळा सूर लाली तर
Essay
Answers
Answer:
शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील जडणघडणीचा पहिला पाया आहे. शाळा आहे म्हणून सर्व काही आहे. जर शाळा नसती तर मानव आपल्या आयुष्यात उंच झेप घेऊ शकला नसता. त्याच्या आयुष्यात इतकी प्रगती करु शकला नसता. शाळा नसती तर मानव चंद्रावर जाऊच शकला नसता.
शाळा नसती तर मानवाला पडणारे भौतिकशास्त्रातील, रसायनशास्त्रातील, गणितशास्त्रातील प्रश्न सुटलेच नसते. शाळा नसती तर विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्याच नसत्या. जगामध्ये सर्व देश आश्चर्यकारक प्रगती करू शकले नसते. शाळा नसती तर खऱ्या अर्थाने जगण्याचा मानवाला अर्थच कळाला नसता.
आज आपण पाहतो मानवाने आपल्या जीवनात विज्ञानाच्या साह्याने खूप प्रगती केली आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवाने असंख्य नवे शोध लावून आपले जीवन सुखकर केले आहे. मोटारी, विमाने, कंप्यूटर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा शोध लावून मानवाने आपल्या आयुष्यात खूप प्रगती केली आहे. हे सर्व मानवाला केवळ शाळेमुळे शक्य झाले आहे.माणसाला जगण्यासाठी दैनंदिन जीवनामधील आकडेमोड करण्यासाठी, हिशोब ठेवण्यासाठी, संदेश वाचण्यासाठी मूलभूत ज्ञानाची गरज असते. हे सर्व ज्ञान मानवाला शाळेतूनच मिळते. शाळा नसती तर या जगामध्ये झालेली डिजिटल क्रांती आपणास पहावयास मिळाली नसती. डिजिटल भाषा, कोडिंग भाषा, यांचा शोध लागला नसता.