India Languages, asked by atharvabhaleraos3, 8 months ago

शाळेत गांधी जयंती साजरी केली या विषयावर बातमी लिहा​

Answers

Answered by preranarajnag2809
16

गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

स्वच्छता अभियान, व्याख्यान, प्रतिमापूजन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमांतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरीस्वच्छता अभियान, व्याख्यान, प्रतिमापूजन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमांतून शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करवीरनगरीसह अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली.

गतवर्षी गांधी जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता. शुक्रवारी गांधी जयंतीचे औचित्य साधून शहर भाजपाच्या वतीने दत्त महाराज परिसरातील रस्त्यावरील कचरा, प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेत जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह कार्यकत्रे उतरले होते. पापाची तिकटी येथील गांधीजींच्या पुतळ्याची अनेक वष्रे देखभाल व रंगरोटी करणारे आनंदराव माजगांवकर यांचा सत्कार जाधव यांचा हस्ते करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इचलकरंजी येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. शहराध्यक्ष विलास रानडे यांनी गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छता केली. शहरामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

इचलकरंजी शहर काँग्रेस भवनामध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष रवींद्र माने यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

I hope it helps you

Similar questions