शाळेतून इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करणारे पत्र लाहा
plz give me letter in marathi
Answers
Answer:
प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
पेंडसे विद्यालय,
ठाणे.
विषय- शालेय शिष्यवृत्ती मिळणेबाबत
माननीय महोदय,
मी आदिती शिंदे आपल्या शाळेत इयत्ता ८वीअ मध्ये शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी अभ्यासात हुशार आहे. प्रत्येक वर्षी माझा पहिला क्रमांक येतो, तसेच मी इतर राज्यस्तरीय परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी प्राविण्य मिळविले आहे. मला शिकून पुढे जाऊन वकील व्हायचे आहे. माझ्या कुटुंबात एकूण सहा व्यक्ती आहेत, त्यापैकी फक्त माझे वडील कमवतात. ते एका खाजगी कंपनीत इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात. आई अंथरुणाला खिळलेली असते, मला एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण आहेत दोघेही शिक्षण घेत आहेत आणि आजीचेही वय सत्तरीच्या वर आहेवडिलांच्या तुटपुंज्या पगारात संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागविणे खूप कठीण जाते.
मी आपल्याला नम्र विनंती करते कीमला माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी. मला शिष्यवृत्तीचा लाभ झाल्यास मी माझे शिक्षण आर्थिक अडचणीशिवाय पूर्ण करु शकते, ज्यामुळे माझ्या बाबांना आर्थिक आधार मिळेल.यासाठी नेहमीच आपली आभारी राहीन.
आपली आज्ञाधारक विद्यार्थिनी,
आदिती शिंदे,
८वी/ अ