(२) शाळेत साजरा झालेल्या 'योग दिनाची बातमी तयार करा.
Answers
Answer:
शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतही हा प्रस्ताव मांडला होता. त्याला तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आलेले आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली हाती. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले आहेत. प्रथमच एखाद्या प्रस्तावाला एवढय़ा देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.
आदर्श विद्यालयात योग दिवस साजरा
नाशिक,२२ जून:आदर्श विद्यालय गांधी चौक येथे सर्वांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते. महर्षी योग विद्यालयातील प्रमुख माननीय श्री राजेश भट कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले व श्री राजेश भट यांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले. श्री राजेश भट यांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले.
माननीय मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी श्री राजेश भट यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षक श्री शर्मा सर यांनी सर्वांचे आभार मानले. अशाप्रकारे आदर्श विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला.