Hindi, asked by kaliasgar6, 5 months ago

शू मार्ट जाहिरात लेखन

Answers

Answered by simreensaini
1

जाहिरात लेखन मराठी मध्ये Jahirat Lekhan in Marathi Language

एखाद्या वस्तूची मागणी वाढविण्यासाठी आकर्षक व मोजक्या शब्दांत केलेलं लेखन म्हणजे जाहिरात लेखन. आपल्या वस्तूच्या उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, राहणीमानाचा दर्जा, त्यांचे जीवनमान याचा आढावा घेऊन चटकदार व मोहक भाषाशैलीने आकर्षित करून घेणे हे एक कसब आहे. आणि त्यासाठी म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक, काव्यमय शब्दांचा साठा असणे आवश्यक आहे.

जाहिरातीचे मुख्यतः तीन प्रकार आहेत.

श्राव्य, दृश्य व दृक्श्राव्य या प्रकारांमध्ये वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, भित्तिपत्रक, छापील पत्रके, रेल्वेस्थानक, बसस्थानक, माहितीपुस्तिका, बॅनर्स ही सर्व माध्यमं आपल्यापर्यंत जाहिरात पोहोचवितात.

सरकारही आपल्या जनतेच्या जागृतीसाठी जाहिरातीचा भरपूर उपयोग करतात. पोलिओ निर्मूलनासाठीही 'दो बूंद जिंदगी की' ही जाहिरात भारतातील सर्व खेडोपाडी पोहोचलेली आहे.

जाहिरात लेखन

सरावासाठी खाली दिलेल्या वस्तूंची आकर्षक जाहिरात तयार करा.

१) स्पोर्टशूज (खेळासाठी वापरले जाणारे बूट)

२) एखाद्या कंपनीच्या पेनाची जाहिरात करा.

३) एखाद्या व्यायामशाळेची जाहिरात तयार करा.

४) एखाद्या 'जनरल स्टोअर'ची (जिथं सर्व वस्तू मिळतील) जाहिरात करा.

५) संगणक क्लासची जाहिरात तयार करा.

६) एखाद्या गृहसंकुलाची जाहिरात आकर्षकपणे तयार करा.

Similar questions