श्न ५. आतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली
भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.
Answers
Answered by
16
Answer:
Bhai iss sentense ka karna kya hai ye to bata.
Answered by
58
Explanation:
नवी दिल्ली – तब्बल १५ हजार यात्रेकरू उत्तराखंडमध्ये विष्णुप्रयागजवळ भूस्खलन झाल्याने अडकले असून उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. पण या भूस्खलनामुळे यात्रेकरू अडकले आहेत. महाराष्ट्रातील १००हून अधिक यात्रेकरूंचा समावेश या यात्रेकरूंमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.
हे भूस्खलन चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून ९ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागातील १५० मीटर परिसरात भूस्खलन झाले आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हाथीपहाडवरील एक मोठी शिळा अचानक तुटून कोसळली. त्यानंतर हायवेवरील ५० मीटरचा भाग पूर्णपणे बंद झाला. हाथीपहाडमध्ये दोन्ही बाजूंना ५०० हून अधिक वाहने अडकून पडली आहेत.
Similar questions