शारीरिक श्रमाचे महत्व पांच वाक्य लिहा
Answers
Answer:
आजचे युग हे विज्ञान संगणक युग मानले जाते. या संगणक युगात आपण सर्वजण वावरत आहोत. आज संगणक युगामुळे मानवाचे जीवन अगदी सुलभ झाले आहे. त्यामुळे मानव सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागला आहे.
त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्या श्रमिकांना आज यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानले जात आहे. असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा आणि श्रमिकांचा अपमान आहे.
बौद्धिक कष्टा इतकेच शारीरिक कष्ट करणे सुद्धा महत्वाचे आहे. कष्ट केल्यानेच माणसाची प्रगती होते. तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा श्रम करणे महत्वाचे आहे.
श्रम म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करते व मेहनत करते त्याला एका अर्थाने काम करणे असे म्हटले जाते. श्रम करण्यामागे ध्येय मिळवण्याचा विचार असतो.
Explanation:
प्रत्येकाच्या जीवनामध्ये श्रमाला खूप महत्त्व आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रम ही मुलभूत गोष्ट आहे. श्रम केल्याशिवाय जीवनात यश आणि यशाची कल्पना करू शकत नाही. मानवाने जर शारीरिक श्रम केलेत तर त्याला शरीर सौष्ठव लाभू शकते.
दररोज काम करणे हेच शारीरिक श्रम आहेत. श्रमिक जे काम करतात ते शारीरिक श्रम असतात कारण त्यांना जास्त शम करण्याची गरज भासत नाही. श्रमिक जे काम करतात त्यामुळे त्यांना जरुरीपेक्षा व्यायाम मिळतो.
अनेकदा त्यांना घटक सुद्धा ठरतो. पण बौद्धिक श्रम करणाऱ्या लोकांना लट्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग इ. आजार होतात. म्हणून त्यांनी स्वतला वाचवण्यासाठी शारीरिक श्रम करणे गरजेचे आहे.