२शिरीष आत येताच लेखकाने त्याला कोणता
प्रश्न विचारला?
O ] तुझ्या वडिलांमुळे तू आला नाहीस का?
ON तुला आता संगीत आवडत नाही का?
O O
३ तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत
होतास?
Answers
Answer:
एका रात्रीत पार्सल पोहोचवण्याची कल्पना प्रत्यक्षात यायला फेडेक्सच्या फ्रेड स्मिथला प्रत्यक्षात ११ वर्ष लागली.
१९६२ साली फ्रेड स्मिथने त्याच्या अर्थशास्त्राच्या तासाला ‘रात्रीत पार्सल पाठवण्याची सेवा’ या विषयावर एक निबंध लिहिला होता. त्याची कल्पना ही होती की, त्याची कंपनी जगाच्या कोणत्याही भागामधून लहानातील लहान वस्तू जगाच्या कोणत्याही भागामध्ये पोहोचवेल. त्याच्या शिक्षकांनी ‘कल्पना नाविन्यपूर्ण आहे आणि चांगल्या रीतीने मांडलीसुद्धा आहे, पण ती व्यवहार्य नाही’ असे म्हणून फ्रेडला ‘क’ श्रेणी (C Grade) दिली होती.
पण फ्रेडने हा विचार सोडून दिला नाही. त्याला आपल्या या कल्पनेवर विश्वास होता. फ्रेडला जेव्हा जहाजावर व्हिएतनामला पाठवण्यात आलं, त्याने तिथे अमेरिकन हवाई दलाच्या पुरवठा सेवेचा (logistics) अभ्यास केला. १९७० मध्ये जेव्हा तो परत आला त्याने Ark Aviation Sales नावाची विमान दुरुस्त करणारी एक कंपनी विकत घेतली आणि जुन्या विमानांचा वापर करायला सुरुवात केली.
१९७३ पर्यंत म्हणजे पुढच्या तीन वर्षात त्याने हवाई दलाच्या पुरवठा सेवेची पद्धत ‘फाल्कन-२०’ या प्रकारच्या १४ विमानांचा ताफा तयार करून जशीच्या तशी अंमलात आणली आणि त्याची कल्पना पहिल्यांदा नाकारली गेल्याच्या अकरा वर्षानंतर फ्रेडने पहिलं पार्सल पाठवलं.
व्यवसाय वाढवण्यासाठी वेंचर कॅपिटलच्या माध्यमातून भांडवल उभे करूनसुद्धा पहिल्या दोन वर्षातच फ्रेडचे २.९० कोटी डॉलर्स (जवळपास १९० कोटी रुपये) बुडाले. घेतलेले पैसे परत करणे कठीण होऊन बसले. बँक अकाउंटमध्ये फक्त ५००० डॉलर्स शिल्लक राहिले होते. फ्रेड लास वेगासला गेला. आपल्याजवळ उरलेले सर्व पैसे त्याने ब्लॅकजॅक (पत्त्यांचा खेळ) मध्ये लावले. सुदैवाने तो २७ हजार डॉलर्स जिंकला. त्या पैशातून त्याने सर्व कर्ज फेडून टाकली आणि फेडेक्स वाचवली. त्यानंतर एके दिवशी त्याचा सहकारी रॉजर फ्रॉकने त्याला पैसे कुठून आणले असे विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले, “जनरल डायनामिक्स कंपनीबरोबरची आपली मिटिंग फिस्कटली. आपलं मोठं नुकसान झालं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत
सोमवारपर्यंत पैसे उभे करावे लागणार होते, म्हणून मी विमानाने लास वेगासला गेलो आणि तिथे २७ हजार डॉलर्स जिंकलो.”
रॉजर म्हणाला, “म्हणजे तू आपल्याकडे उरलेले शेवटचे ५ हजार डॉलर्स घेऊन गेलास. तू असं कसं करु शकतो?”
आपले खांदे उडवत तो म्हणाला, “काय फरक पडला असता? पैशांशिवाय आपण विमानात इंधन सुद्धा भरू शकत नाही. या पैशांनी काही दिवस तरी आपलं काम सुरु राहील.”
फेडेक्सला त्यानंतरसुद्धा अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण फ्रेडने मोठ्या धीराने आणि हिंमतीने सर्व संकटातून मार्ग काढत वाटचाल सुरूच ठेवली. आज चाळीस वर्षानंतर, फेडेक्स जगातील सर्वात मोठ्या कुरियर कंपन्यांपैकी एक आहे. २०१८ मध्ये फेडेक्सचे वार्षिक उत्पन्न ६५.४५ अब्ज डॉलर्स होते. फ्रेडची ही कंपनी वर्षाला अब्जावधी पार्सल पाठवते आणि फ्रेडची स्वतःची जवळपास ५.४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
एका रात्रीत यश मिळवणं असो किंवा एका रात्रीत पार्सल पाठवणं, कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात यायला काही वेळ हा लागतोच, त्यानंतर मात्र त्याची वाढ झपाट्याने होते. प्रत्येक दिवस हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ‘रात्रीत मिळणाऱ्या यशाकडे’ घेऊन जातोय हे नेहमी लक्षात ठेवा.