Science, asked by gangardeomkar3, 1 month ago

श्राव्यातील ध्वनीचे तीन उपयोग

Answers

Answered by jagtapkripa
1

Answer:

what is the first word ...

Answered by aryanthorat2610
3

Answer:

उपयोग : श्राव्य व श्राव्यातीत ध्वनी ह्यांच्या स्वरूपात कमी-अधिक कंप्रता एवढाच फरक असला, तरी त्यांच्या उपयुक्ततेत फारच अंतर आहे. मोठी कंप्रता व म्हणूनच सूक्ष्म तरंगलांबी यांमुळे श्राव्यातीत तरंग औदयोगिक, वैदयकीय, अभियांत्रिकी, विश्लेषण इ. क्षेत्रांत अत्यंत उपयुक्त ठरतात. माध्यमातील कणांच्या आवर्ती गतीमुळे ह्या तरंगांचे प्रसारण होते व तरंगांच्या बहुकंप्रतेमुळे कणांना प्रचंड प्रवेग मिळतो. विविध कार्यांकरिता असा प्रवेग उपयुक्त ठरतो. तसेच श्राव्यातीत तरंगांची तरंगलांबी कमी असल्यामुळे त्यांचे एका विवक्षित दिशेकडे झोताप्रमाणे प्रसारण करणे शक्य होते. तरंगांचे हे दिशागामित्व अनेक बाबींत उपयोगी पडते.

श्राव्यातीत तरंग द्रव पदार्थातून प्रसारित होत असताना त्या पदार्थात लागोपाठ द्रूतवेगाने दाबामध्ये वाढ व घट होत असते. दाबाची ही आंदोलने व तज्जन्य तीव प्रेरणा यांच्यामुळे द्रव पदार्थात अनेक निर्वात अगर द्रवबाष्प असलेले लहानमोठे बुडबुडे निर्माण होतात व ते ताबडतोब विसर्जित होतात. द्रव पदार्थात होणाऱ्या ह्या घटनेला कोटरीकरण असे म्हणतात. बुडबुडे ज्यांभोवती तयार होतात अशी केंद्रे म्हणजे धूलिकण किंवा द्रवामध्ये आधीच विरघळलेल्या वायूचे सूक्ष्म बुडबुडे इत्यादींच्या स्वरूपात द्रव पदार्थामध्ये सर्वसाधारणपणे असतातच. अशी केंद्रे बुडबुडयांच्या निर्मितीला आवश्यक असतात. घडयाळातील भाग, उपकरणांचे सुटे भाग इ. स्वच्छ करण्यासाठी कोटरीकरणाचा उपयोग करतात. उकळणारे पाणी हे कोटरीकरणाचे नेहमीच्या आढळातील एक उदाहरण होय. मूलकणांच्या संशोधनाकरिता वापरण्यात येणारी बुद्‌बुद्‌ कोठी [वेगवान विद्युत् भारित कणाचा मार्ग त्याच्या मार्गावरील बुडबुडयांनी दर्शविणारा अभिज्ञातक [⟶ कण अभिज्ञातक] कोटरीकरणामुळेच कार्यान्वित होते. श्राव्यातीत तरंगांच्या साहाय्याने विविध तऱ्हेच्या उदयोगधंदयांना लागणाऱ्या यांत्रिक व रासायनिक प्रकिया घडविणे अशा अगणित लघुकालजीवी बुडबुडयामुळे शक्य होते. ⇨ओतकामा साठी वितळविलेल्या धातूच्या रसातील हवेचे बुडबुडे या प्रकारे काढून टाकून ओतकाम निर्दोष करण्यासाठी श्राव्यातीत तरंगांचा उपयोग करतात. श्राव्यातीत तरंग प्रसारित होत असता, द्रवात होणाऱ्या कंपनांमुळे, सूक्ष्मकण चूर्ण व द्रव ह्यांचे घनिष्ट मिश्रण [⟶पायस] तयार करता येते, तसेच काही मिश्रधातूही तयार करता येतात. पुष्कळ उदयोगधंदयांकरिता प्राणिजन्य, वनस्पतिजन्य किंवा रासायनिक प्रकारे बनविलेले कृत्रिम धागे लागतात. अशा वेळी धाग्यांमध्ये काही यांत्रिक गुणधर्म विशेष प्रमाणात असणे जरूरीचे असते. याकरिता धाग्यांवर काही द्रव्यांच्या साहाय्याने रासायनिक प्रकिया केली जाते. प्रकिया करताना द्रवामध्ये जर श्राव्यातीत कंपने निर्माण केली, तर प्रकियेचा वेग व क्षमता कोटरीकरणामुळे वाढविता येतात, असे आढळून आले आहे.

Explanation:

Thanks me

Mark me as branilist

vote me as exelent

Similar questions