India Languages, asked by atolevandana06, 9 hours ago

श्राव्यातीत ध्वनीचेकोणतेही तीन उपयोग लिहा.​

Answers

Answered by kalpanasalunke121
17

Answer:

श्राव्यातीत ध्वनिकी : दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांच्या (आवर्तनांच्या) संख्येला कंप्रता म्हणतात. हर्ट्‌झ हे कंप्रतेचे एकक असून १,००० हर्ट्‌झ म्हणजे एक किलोहर्ट्‌झ होय. वीस किलोहर्ट्‌झपेक्षा जास्त कंप्रतेचे विशेष प्रकारचे दाब तरंग म्हणजे श्राव्यातीत ध्वनितरंग होत व त्यांच्या शास्त्रीय अध्ययनाला श्राव्यातीत ध्वनिकी म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या तरंगास विशिष्ट कंप्रता असते. १६ हर्ट्‌झ ते सु. २० किलोहर्ट्‌झपर्यंत कंप्रता असलेले ध्वनितरंग सर्वसामान्यपणे मानवाला कानांनी ऐकू येतात म्हणून ते तरंग ‘ श्राव्य ’ होत. याहून अधिक कंप्रतेचे तरंग मानवी श्रवणेंद्रियांना प्रतीत होत नाहीत म्हणून त्यांना श्राव्यातीत ध्वनितरंग अशी संज्ञा आहे (१६ हर्ट्‌झपेक्षा कमी कंप्रतेच्या तरंगांना अवश्राव्य तरंग म्हणतात ). आधुनिक तंत्रज्ञानामुळे १ कोटी किलोहर्ट्‌झ कंप्रतेपर्यंतचे ध्वनितरंग निर्माण करणे शक्य झाले आहे. ज्या माध्यमाचे घटक कण खूप जवळजवळ असल्याने एकमेकांशी अन्योन्यकिया करतात अशा माध्यमामध्ये पदार्थाच्या कंपनांतून या तरंगांची निर्मिती होते. पोकळी आणि अतिशय विरल वायू वगळता सामान्य आणि उच्च दाबाखाली घन, द्रव व वायूंमध्ये ही अट पुरी होते व त्यांत श्राव्यातीत तरंग निर्माण होऊ शकतात.

Explanation:

I hope it helps you dear .mark me brinilest.

Similar questions