श्रावण महिन्यातील पाऊस - मराठी निबंध
Answers
Answer:
श्रावणातला पाऊस म्हणजे ऊन पावसाचा खेळ जणु
श्रावणातल्या पावसात सर्वत्र हिरवेगार गवत जणु काही हिरवीगार गालिचा पसरलेली असते ती येणारी हळुच पावसाची सर अंगावर स्पर्श करते तेव्हा अंग शहारून येते श्रावणातल्या पावसाची मजा काही वेगळीच असते श्रावण महिन्यात अचानक येणारी पावसाची आणि ऊनसावळी कोणीतरी वरुन पाणी शिंपडावे तसे काही
श्रावणातल्या पावसाची मजा आनंद खेडे गावात
माझी स्वताची आठवण मी सांगत आहे
श्रावणातल्या पावसामध्ये शेत माळरान हिरवं गार ते सौंदर्य काही वेगळाच असतो
श्रावणातल्या पावसात शेतात येणाऱ्या किरव्या जणु काही मोती जणु त्या किरव्या पकडण्याची मजा काही वेगळीच असते
श्रावणातल्या पावसात जर अंगणात खेळताना बागडताना पावसाची सर आली की आम्ही नाचायचो आणि आमचं गाणं चालू ''ऊन पाऊस कोल्ह्याच लगीन''
श्रावणातल्या पावसात पशु पक्षी तृप्त होऊन नाचत बागडत असतात मोर तर आपला पिसारा फुलवून नाचत असतो तेव्हा मोराचा आवाज ऐकायला गोड वाटते त्याच्यात कोकीळेचा आवाज इतक छान ऐकायला मधुर गोड वाटतो
बालकवी ची कविता आहे
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे.