श्रावणातला पाऊस निबंध
Answers
श्रावणातील पाऊस म्हणजे अंगावर घ्यावासा वाटणारा पाऊस असतो.ऊन सावलीचा खेळ आणि त्यात पडणारा श्रावणी पाऊस एक वेगळाच आनंद देऊन जातो. श्रावणातील आनंद लिहून सांगण्यापेक्षा स्वतः जास्त अनुभवून समजू शकतो.
श्रावणातील पाऊस खरे तर ऊन सावलीचा खेळ असतो. शांत असा पडणारा हा पाऊस अंगाला एक सुंदर असा स्पर्श करून जातो जो प्रत्येकाला हवाहवासा असतो. श्रावणातील पाऊसाचा खरा खेळ खेड्यात अनुभवण्याची वेगळीच मजा असते. खान्देशात अशा पाऊसाची मजा आणि कोकणातील पुण्यातील असल्या रिमझिम पाऊसाची मजा खूपच फरक आहे.
श्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन निसर्गकवी बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे व वास्तव केले आहे. ते म्हणतात,
‘श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात पिवळे ऊन पडे’
पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशावेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते तर कधी हळूच ऊन येते. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस पडतो, तर कधी पावसात ऊन पडते, पाऊस वेडा असतो म्हणून श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधत असावेत किंवा आषाढात पाऊस माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधीत असावा.
श्रावणा तील सरी सारखा
तू हळुवार येशील का?
ऊण पाऊसा खेळ माझ्याशी
तू खेळशील का?
माझ्या स्वप्नांना
खरे करशील का?
सांग ना
माझा श्रावण पाऊस होशील का?
प्रेमीही श्रावणात इंद्र धनुषी रंग बरसत असतात. प्रेमिकेला प्रेमी श्रवणासारखा हवा आहे.ऊन पाऊसाचा खेळ खेळणारा हवा आहे. पुण्यात तर प्रेमी खूपच कवितेत बोलणारे असतात. खर सिंहगडावर निसर्गाचे पाऊसातिल रूप अनुभवण्यासाठी प्रेमीप्रेमिका जात असतात.