शौर्य दोन मित्र नदी मदत या शब्दांवरून गोष्ट तयार करा
Answers
Answer:
अनिलचे शौर्य -
एकदा एका गावात दोन मित्र राहत होते. एकाचे नाव अनिल तर दुसऱ्याचे नाव रमेश होते. दोघेही खूप जिवलग मित्र होते. आणि अभ्यासात देखील खूप हुशार होते. रमेश आणि अनिल कुठेही जाताना सोबत रहात असत. त्यांचे गाव खूप छोटे होते. गावाच्या पलीकडे एक नदी होती. नदीतील पाणी खूप स्वच्छ व नितळ होते. पावसाळ्यात नदी तुडुंब भरून वाहत असे.
शहराकडे जाताना गावातील लोकांना नदी ओलांडून जावे लागत असे. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. रमेशची आई खूप आजारी होती. गावात डॉक्टर नसल्यामुळे गावातील लोकांना शहरात इलाजासाठी जावे लागत असे. आई आजारी आहे अशा परिस्थितीत आता काय करायचे रमेशला काही सुचत नव्हते. रमेशने शहराकडे औषध घेण्यासाठी ठरवले.
रमेश नदीच्या वाटेने औषध घेण्यासाठी निघाला नदीतून रस्ता पार करत रमेश जायला निघाला. यावेळी रमेश एकटाच होता त्याच्यासोबत अनिल नव्हता. अचानक त्याचा पाय नदीत घसरला व तो पाण्यात बुडायला लागला. रमेशला तर पोहता येत नव्हते नदीच्या पाण्यात रमेश बुडत आहे ही बातमी गावभर पसरली जेव्हा ही बातमी अनिलच्या कानावर पडली तेव्हा अनिल ने लगेच नदीकडे धाव घेतली. अनिलला पोहण्याची कला अवगत होती. त्यामुळे आपल्या जिवलग मित्राचे प्राण वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. असे त्याने मनाशी ठरवले आणि पाण्यात उडी घेतली.
स्वतःच्या प्राणाची बाजी लावून अनिल ने रमेश ला मदत करायचे ठरवले. अशाप्रकारे रमेशने त्याचे शौर्य दाखवून अनिल चा जीव वाचवला आणि अनिल ची आईदेखील गावातील वैद्य बुवांनी दिलेल्या औषधाने बरी झाली. संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र हे खरे आहे.