Economy, asked by asonavane307, 2 months ago

) श्रम बाजाराचे स्वरूप हे कोणत्या स्वरूपासारखेच असते?​

Answers

Answered by ramchandrashinde75
2

Explanation:

श्रमिक : ( लेबरर ). ज्या व्यक्ती शारीरिक श्रम करतात, त्यांना श्रमिक समजले जावे, अशी सर्वसाधारण समजूत आहे. म्हणजे शेती, कारखाने, खाणी येथे काम करणाऱ्यांचा यात समावेश होतो. श्रमाची व्याख्या अधिक व्यापक आहे. शारीरिक कष्टाच्या बरोबरीने मानसिक किंवा बौद्धिक कष्ट करणाऱ्यांचा समावेशही श्रमिकाच्या व्याख्येत केला जातो. यात शिक्षक, डॉक्टर, वकील, एंजिनिअर, कंपनी व्यवस्थापक अशाही व्यक्तींचा विचार करावा लागेल. मात्र केवळ शारीरिक किंवा मानसिक कष्ट म्हणजे श्रम नव्हे. छंद म्हणून सुतारकाम करणारा माणूस, सरावासाठी खेळणारा खेळाडू , संगीताचा रियाझ करणारा गायक, यांच्या प्रयत्नांना श्रम म्हटले जात नाही व त्यांना श्रमिक म्हटले जात नाही. शारीरिक अथवा मानसिक कष्टातून काही मोबदला किंवा प्राप्तीची अपेक्षा ठेवणाऱ्यालाच, श्रमिकाच्या व्याख्येत बसविता येईल. ‘ आर्थिक किंवा भौतिक लाभाच्या मोबदल्याच्या अपेक्षेने केलेल्या शारीरिक-मानसिक अशा प्रयत्नांना श्रम म्हणावे ’, अशी व्याख्या या संदर्भात करता येईल असे श्रम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे श्रमिक होत. त्यामुळे ⇨ शेतमजूर, औदयोगिक कामगार, बँक अधिकारी, कायदेशीर सल्लगार अशा सर्वांचा समावेश श्रमिकाच्या व्याख्येत होईल.

वर्गीकरण : श्रमिकांचे वर्गीकरण विविध प्रकारे करता येते. शारीरिक व मानसिक श्रम करणारे श्रमिक, असा प्राथमिक प्रकार मानला जातो. शेतमजूर, लोहार, सुतार अशा व्यक्ती शारीरिक श्रम करतात तर सल्लगार, व्यवस्थापक, वकील, शिक्षक हे मानसिक श्रम पुरवितात. कामासाठी शिक्षण, प्रशिक्षण घेऊन किती प्रमाणात कौशल्य प्राप्त करून घेतले, त्यावरही श्रमिकाचा प्रकार ठरविला जातो. त्यानुसार कुशल, अर्धकुशल व अकुशल श्रमिक असे प्रकार होऊ शकतात. घरगडी, मदतनीस, हमाल अशा व्यक्ती अकुशल या सदरात मोडतील. एंजिनिअर, वकील, कंपनी व्यवस्थापक हे कुशल या सदरात मोडतील. कामासाठी थोडे किंवा जुजबी प्रशिक्षण घेणाऱ्यांना अर्धकुशल असे नाव दिले जाते. स्त्री-कामगार, पुरूष-कामगार, ⇨बालकामगार असेही वर्गीकरण मांडले जाते. उत्पादक श्रम व अनुत्पादक श्रम असे प्रकारही आढळतात. शेतकरी, औदयोगिक कामगार हे उत्पादक श्रमिक तर शिक्षक, वकील हे अनुत्पादक श्रमिक गणले जातील पण पूर्वी केले जाणारे हे प्रकार आज कालबाह्य ठरविले जातात. देशात अन्नधान्य,कपडे इ. तयार करण्यासाठी जशी श्रमिकांची गरज भासते, तशीच गरज बँक अधिकारी, सल्लगार यांचीही असते. त्यांच्या सेवेस मोबदलाही दिला जातो. त्यामुळे त्यांना अनुत्पादक म्हणणे योग्य होणार नाही. तसे पाहता सर्व श्रमिकच उत्पादक आहेत, असे मानणे योग्य होईल.

its ok friend.

Similar questions