शिष्याला आपला गुरु कोणकोणत्या रूपांमध्ये दिसतो?
Answers
Answer:
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. अगदी प्राचीन काळापासून गुरु-शिष्यांचे अतूट नाते आपल्याला पाहायला मिळते. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. इतिहासात अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या. आधुनिक काळातही अनेक गुरु-शिष्य आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा शिष्यामुळे गुरुचे नाव मोठे झाल्याचेही पाहायला मिळते. गुरुने दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश, प्रगती, कीर्तीसह लोककल्याणासाठी झटतो, तोच खरा शिष्य, असे मानले जाते. आजच्या काळात गुरु आणि शिष्य यांच्या व्याख्या अतिशय बदलल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, इतिहासात अशा काही गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत, ज्या जगभरात कायम लक्षात राहतील. पृथ्वीच्या अंतापर्यंत या गुरु आणि त्यांच्या शिष्यांबद्दल कायम बोलले जाईल. जाणून घेऊया.