World Languages, asked by vibhu1268, 8 months ago

शेत्कार्यचे आत्मकथन मराठी निबंध.

Answers

Answered by abinavs
2

Answer:

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक हे गावात राहतात आणि शेती करतात. आमच्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे.

गावातील शेतकरी दिन – रात मेहनत करून शेतीची कामे करतो, पिक उगवतो आणि संपूर्ण मानवतेचे पोषण करतात. म्हणून या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानला जातो.

शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर गरिबी, दुष्काळ, कर्जबाजारी, अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहणारा तसेच आत्महत्या करणारा होय.

शेतकऱ्याचे मनोगत

मी एक छोटा शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातील साताऱ्या गावात माझी थोडी जमीन आहे. ही जमीन माझी माय आहे. ही जमीन फारशी सुपीक नाही पण नापीकही नाही आहे.

या जमिनीवर माझे भरपूर प्रेम आहे. पण माझी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आमच्या गावाच्या जवळ पास एक मोठी नदी आहे. लहान – लहान नद्यांना पाणी हे असतच. पण तेही पावसावरच अवलंबून.

उन्हाळ्यात त्या पण नदीचे पाणी हे आटून जाते. त्यामुळे मृगाच नक्षत्र आल कि आम्ही आकाशाकडे डोळे लावून असतो.

काळ्या ढगांचे वर्णन

आम्ही शोधत असतो कि, कुठे दिसतोय का हा काळा विठोबा – म्हणजेच काळे ढग. त्या आधी आम्ही जमीन नांगरून ठेवायची आणि ढेकळ फोडायची. तसेच पावसाची वाट बघत बसायचो.

उन्हाळ्यात शेतीच काम करून अंग नुसत भाजून निघायचं. पण पाण्याचा काही पत्ताच नसायचा. महिला पिण्यासाठी पाणी भरपूर दूरवरून आणत असत.

पावसाचे आगमन

मग कधीतरी अचानक मळभ येते. आकाश काळेभोर दिसू लागते. सोसाट्याच वार सुटत आणि काही वेळाने पाण्याचे टपटप थेंब धरतीवर पडू लागतात.

Similar questions