शेती पिकावरील विविध रोग महत्व
Answers
Answer:
लीफ कर्ल व्हायरस
प्रजात - जेमिनीव्हायरस
वाहक - पांढरी माशी
रोगाची लक्षणे - लीफ कर्ल व्हायरस रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पाने खाली वाळलेली, पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते. झाड खुजे राहते. आलेली फळे आकाराने लहान राहतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढीच्या सुरवातीच्या काळात झाल्यास फळधारणा होत नाही.
मिरचीवरील विषाणूजन्य रोग
टोबॅको लीफ कर्ल व्हायरस
या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. या किडी पानांतील अन्नरस शोषून घेऊन रोगाचा प्रसार करतात. पानांच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानांची वाढ खुंटते. पाने लहान आकाराची, वळलेली, आकसलेली आणि फिक्कट पिवळी होतात. झाडाची वाढ खुंटते. अशा रोगट झाडांना फळे लागत नाहीत, लागली तर लहान आकाराची आणि फार कमी प्रमाणात असतात. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास संपूर्ण पीक वाया जाते व उत्पादनात घट येते.
मोझॅक
स्पर्शाने पसरणाऱ्या रोगांमध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस आणि पोटॅटो व्हायरस एक्स या व्हायरसाचा समावेश होतो; तर मावा किडीमार्फत पसरणाऱ्या व्हायरसमध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरस, टोबॅको इच व्हायरस आणि चिली व्हेनल मोटल व्हायरसचा समावेश होतो. या रोगामुळे पानांचा पृष्ठभाग फिक्कट हिरवट किंवा पिवळसर होतो. त्यामुळे पाने लहान आकाराची, वाकडी, आकसलेली दिसतात. झाडाची वाढ खुंटते. अशा रोगग्रस्त झाडांना फुले-फळे कमी प्रमाणात लागतात.