६) शीत प्रवाहांची निर्मिती कोणत्या
प्रदेशात ?*
Answers
Answer:
पृथ्वीवरील समुद्र व महासागरातून सतत एकाच दिशेने वाहत असणाऱ्या पाण्याला समुद्री प्रवाह असे नाव आहे. हे प्रवाह गरम किंवा गार पाण्याचे असतात. पृथ्वीचे परिवलन, वारे, पृष्ठभागावरील तपमान, पाण्यातील क्षारता व चंद्राचे गुरुत्वाकर्षण ही कारणे हे प्रवाह उत्पन्न करतात. याशिवाय समुद्राची खोली, किनाऱ्याचा आकार, इ. सुद्धा या प्रवाहांच्या दिशेवर व वेगावर परिणाम करतात. हे पाण्याचे प्रवाह हजारो किमी लांबीचे असू शकतात. समुद्री प्रवाहांचा पृथ्वीवरील बहुतांश भागातील हवामान व ऋतूंवर प्रभाव आहे. गल्फ स्ट्रीम याचे उत्तम उदाहरण आहे. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे वायव्य युरोपचे हवामान त्याच अक्षांशावरील इतर भूभागांपेक्षा बरेच गरम असते. याचप्रकारे कॅलिफोर्निया प्रवाहामुळे विषुववृत्तीय पट्ट्यात असलेल्या हवाई बेटांवरील हवामान समशीतोष्ण आहे.
सागरी प्रवाह कारणे :
पृष्ठभागावरील प्रवाह सहसा वाऱ्यामुळे तयार होतात. यानुसार हे प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात उलट्या दिशेने वाहतात. एकमन स्पायरल परिणामामुळे[मराठी शब्द सुचवा] पाण्यातील प्रवाह वार्याच्या दिशेला एक विशिष्ट अंश करून वाहतात. पृथ्वीच्या काही भागातील वार्यांची दिशा ऋतूंप्रमाणे बदलते. त्याचबरोबर तेथील समुद्री प्रवाहही आपली दिशा बदलतात.
खोलवर वाहणारे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतांमुळे तयार होतात. थर्मोहेलाइन सर्क्युलेशन [मराठी शब्द सुचवा] हे घनतेच्या तफावतामुळे महासागराच्या तळाशी वाहणारे प्रवाह आहेत. हे पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात.
वेगवेगळ्या भागांतील पाण्याचे तापमान हेही समुद्री प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही. असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालींमुळे प्रवाह निर्माण होतात. विषुववृत्तीय प्रदेशात गरम झालेले पाणी वर येता ध्रुवीय प्रदेशांकडचे गार पाणी खोल प्रवाहातून येथे खेचले जाते तर गरम पाणी ध्रुवीय प्रदेशांकडे पृष्ठभागावरुन वाहत राहते.
पृष्ठभागांवरील प्रवाहातून महासागरांतील १०% पाणी वाहते. वरच्या ४०० मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील प्रवाह समजले जातात. या प्रवाहांना स्वेर्डप (sv) या एककानिशी मोजले जाते. एक स्वेर्डप म्हणजे १०६ घनमीटर प्रतिसेकंद प्रवाह आहे.
प्रवाहांबद्दलची माहिती व परिणाम संपादन करा
समुद्री प्रवाह हे अनंत काळापासून वाहत आलेले आहेत. या प्रवाहांतून त्याच दिशेने प्रवास करणाऱ्या जहाजांना इंधन व वेळ कमी लागतात तर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या जहाजांना जास्त. म्हणून खलाशांनी समुद्री प्रवाहांचे ज्ञान पूर्वीपासून आत्मसात केलेले आहे. उलट दिशेने प्रवास करायचा झाल्यास खलाशी थोडेशी वाट बदलून एखादा प्रवाह पकडतात व वेळ वाचवतात. शिडाची गलबते असताना हे जास्त महत्त्वाचे होते. उदा. पोर्तुगीझ शोधकांना आफ्रिकेच्या किनाऱ्यालगत सोसाट्याने दक्षिणेकडे वाहणार्या अगुल्हास प्रवाहामुळे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत उत्तरेस येणे अवघड झाले व त्यामुळे त्यांचे भारतात आगमन होण्यास अनेक वर्षे जास्त लागली. हाच प्रवास आफ्रिकेचा किनारा सोडून किंचित पूर्वेकडून केला असता, किंवा अरबी समुद्राला काट मारून थेट पूर्वेकडे आले असता अनेक आठवड्यांचे वेळ वाचतो. डीझेल किंवा अणुऊर्जावर चालणारी जहाजे व पाणबुड्याही अशा प्रवाहांचा आजही उपयोग करतात.
समुद्री प्रवाहांमुळे पृथ्वीच्या विविध भागातील प्रजातींचे आवागमन होत राहते. समुद्री ईल व सामन माश्यांचे जीवन याचे उदाहरण आहेत.
समु्द्रातील अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी प्रवाहांची माहिती आवश्यक आहे. तसेच या अवशेषांवरुन प्रवाहांचाही अभ्यास होतो.
महासागरांतील मुख्य प्रवाह
अटलांटिक महासागर
अगुल्थास प्रवाह
अँगोला प्रवाह
अँटिल्स प्रवाह
एझोर्स प्रवाह
बॅफिन बेट प्रवाह
बेंग्विला प्रवाह
ब्राझिल प्रवाह
केनेरी प्रवाह
केप हॉर्न प्रवाह
कॅरिबियन प्रवाह
पूर्व ग्रीनलँड प्रवाह
पूर्व आइसलँड प्रवाह
फॉकलंड प्रवाह
फ्लोरिडा प्रवाह
गुयाना प्रवाह
गिनी प्रवाह
अखाती प्रवाह
इर्मिंगर प्रवाह
लाब्राडोर प्रवाह
लोमोनोसोव (खोल)
लूप प्रवाह [मराठी शब्द सुचवा]
उत्तर अटलांटिक प्रवाह
उत्तर अटलांटिक ड्रिफ्ट[मराठी शब्द सुचवा]
उत्तर ब्राझिल प्रवाह
उत्तर विषुववृत्तीय प्रवाह
उत्तर विषुववृत्तीय प्रतिप्रवाह
नॉर्वे प्रवाह
पोर्तुगाल प्रवाह
स्लोप/शेल्फ एज प्रवाह[मराठी शब्द सुचवा]
स्लोप जेट प्रवाह[मराठी शब्द सुचवा]
दक्षिण अटलांटिक प्रवाह
दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह
स्पिट्सबर्गेन प्रवाह
सबट्रॉपिकल प्रतिप्रवाह[मराठी शब्द सुचवा]
पश्चिम ग्रीनलँड प्रवाह
पश्चिम वारे ड्रिफ्ट[मराठी शब्द सुचवा]
आर्क्टिक महासागर संपादन करा
पूर्व ग्रीनलँड प्रवाह
नॉर्वे प्रवाह
बॉफोर्ट जायर (पाणी, बर्फ)
ध्रुवीय प्रवाह (पाणी, बर्फ)
पॅसिफिक महासागर संपादन करा
अलास्का प्रवाह
ऍल्युशियन प्रवाह
कॅलिफोर्निया प्रवाह
क्रॉमवेल प्रवाह (खोल)
पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह
विषुववृत्तीय प्रतिप्रवाह
हम्बोल्ट प्रवाह (पेरू प्रवाह)
कामचात्का प्रवाह
कुरोशियो प्रवाह (कुरोसिवो प्रवाह, जपानी प्रवाह)
मिंडनाओ प्रवाह
उत्तर विषुववृत्तीय प्रवहा
उत्तर पॅसिफिक प्रवाह (उत्तर पॅसिफिक ड्रिफ्ट)
ओयाशियो प्रवाह (ओया सिवो प्रवाह)
दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह
पश्चिम वारे ड्रिफ्ट
हिंदी महासागर संपादन करा
अगुल्हास प्रवाह
पूर्व मादागास्कर प्रवाह
विषुववृत्तीय प्रतिप्रवाह
इंडोनेशिया थ्रु-फ्लो[मराठी शब्द सुचवा]
लीयुविन प्रवाह
मादागास्कर प्रवाह
मोझाम्बिक प्रवाह
सोमाली प्रवाह
दक्षिण ऑस्ट्रेलिया प्रतिप्रवाह
दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह
भारतीय मॉन्सून प्रवाह
पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह
पश्चिम वारे ड्रिफ्ट[मराठी शब्द सुचवा]
अँटार्क्टिक समुद्र संपादन करा
अँटार्क्टिक ध्रुवप्रदक्षिणा प्रवाह
वेड्डेल जायर
तास्मान आउटफ्लो[मराठी शब्द सुचवा]
संदर्भ व नोंदी संपादन करा
Explanation: