India Languages, asked by kawalesushil, 4 months ago

शांता शेल्के वर निबंध लिहा​

Answers

Answered by prapti200447
0

शेळके, शांता : (१२ ऑक्टोबर १९२२-६ जून २००२) ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. जन्म इंदापूर (जि. पुणे). खेड, मंचर या परिसरात त्यांचे बालपण व्यतीत झाले. शांताबाईंचे आजोबा (वडिलांचे वडील) अण्णा हे शाळामास्तर होते. शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते.त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे चिखलदरा,नांदगाव,खर्डी या गावातही त्यांना वास्तव्य करावे लागले.त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला (अंबिका वहिनी) वहिनी म्हणत असत.एकूण ही पाच भावंडे त्यात शांतबाई सगळ्यात मोठ्या.आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले.लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत.त्यामुळे कवितेची आवड,वाचनाची आवड,त्या संस्कारक्षम वयात रूजत गेली. १९३० मध्ये शांताबाईंच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते.यानंतर सारीजण पुण्याला काकांकडे आली.अखेर पुढील शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागेत झाले.सुसंस्कृत सुविद्य,अभिजात अशा या शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले.१९३८ मध्ये त्या मॅट्रीक झाल्या आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्या. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली.या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले.कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला.प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला.हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी.ए. झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली.१९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्.ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोनतीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

साहित्यसंपदा : कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६) तोच चंद्रमा (१९७३) गोंदण (१९७५),अनोळख (१९८६), कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती (१९८६), जन्मजान्हवी (१९९०),चित्रगीते (१९९५),पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुक्ता (१९४४), गुलमोहोर (१९४९), प्रेमिक (१९५६), काचकमळ (१९६९) ,सवाष्ण (१९७४),अनुबंध (१९८०),बासरी (१९८२), कविता करणारा कावळा (बालकथासंग्रह, १९८७) ,सागरिका (बालकथासंग्रह१९९०),हे कथासंग्रह ;विझली ज्योत (१९४६), नरराक्षस (१९४८), पुनर्जन्म (१९५०), धर्म (१९७३), ओढ (१९७५), स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर, या कादंबऱ्या ;शब्दांच्या दुनियेत (१९५९),आनंदाचे झाड, धूळपाटी (१९८२ ),पावसाआधीचा पाऊस (१९८५), एकपानी, वडीलधारी माणसे (१९८९), संस्मरणें (१९९०), मदरंगी (१९९१ ),सांगावेसे वाटले म्हणून (१९९४) हे ललितलेखन इत्यादि विपुल अशी त्यांची साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. धूळपाटी हे त्यांचे आत्मपर लेखन आहे. तालपुष्कर (१९५०) आंधळ्याचे डोळे, औट घटकेचा राजा (१९५७), चौघीजणी (१९६०), गाठ पडली ठका ठका (१९६१) ,गवती समुद्र (१९६२) आंधळी (१९६३) ,गाजलेले विदेशी चित्रपट (१९८९), पाण्यावरल्या पाकळ्या (१९९२), मेघदूत (१९९४) असे अनेक अनुवादही शांताबाईंनी केले आहेत.

Similar questions