Economy, asked by Shraddhamore713, 5 months ago

शेती उत्पदानात् कोणाचि भूमिक महत्वाचि आस्ते

Answers

Answered by Braɪnlyємρєяσя
4

Explanation:

खेड्यांचा शाश्वत विकास आणि पर्यावरणाचे संवर्धन हे ‘वनराई’चे मुख्य ध्येय असले, तरी शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठीही ‘वनराई’ने नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. विशेषतः पाणीटंचाई भासणार्‍या दुष्काळी भागात पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यावर आणि कार्यक्षम पाणीवापरावर ‘वनराई’चा भर राहिला आहे. तसेच शेतजमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करणे यासाठीही ‘वनराई’ने कायम पुढाकार घेतला आहे. याबरोबरच दर्जेदार बियाणे व इतर कृषी निविष्ठा (Inputs) पुरवून अल्पभूधारक व दारिद्य्ररेषेखालील शेतकर्‍यांना सक्षम बनवण्याचे कार्यसुद्धा वनराई अव्याहतपणे करत आहे.

पीकपद्धतीविषयी शेतकर्‍यांमध्ये जागरूकता घडवून आणण्यासाठी ‘वनराई’च्या माध्यमातून गावपातळीवर कृषी मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या कृषी मेळाव्यांमध्ये दरवर्षी सुमारे चार हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होत असतात. पेरणीपूर्व मशागतीपासून पिकांच्या काढणीपश्चात हाताळणीपर्यंतच्या विविध शेतकामांबाबतचे मार्गदर्शन या मेळाव्यांतून केले जाते. याचबरोबर कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे व ‘इक्रिसॅट’सारखी आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रे अशा ठिकाणी शेतकर्‍यांच्या अभ्याससहलींचे आयोजनही केले जाते. ठिकठिकाणचे प्रयोग पाहून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागतात. या सर्व उपक्रमांमुळे शेतीतील उत्पादनात भरघोस वाढ होतेच. शिवाय शेतमालाचे मूल्यवर्धन करून व त्यावर प्रक्रिया करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळवू लागतात. परिणामी, रोजगारासाठी शहराच्या दिशेने कराव्या लागणार्‍या स्थलांतराला आळा बसतो. इतकेच नाही, तर उदरनिर्वाहासाठी पूर्वी शहरात गेलेली कुटुंबे पुन्हा आपल्या गावी परततात आणि शेती व पूरक उद्योगधंदे करून चांगले आयुष्य जगू लागतात.

Similar questions