शेती व समाज निर्मिती यांचा सहसनंद कसा आहे?
Answers
Answer:
v vd
Explanation:
Answer:
भारतातील शेतीच्या प्रश्नांचे स्वरूप नक्की काय आहे, धोरणात्मक पावले, प्रत्यक्ष परिस्थितीमुळे होणारे गुंते काय आहेत याची चर्चा प्रस्तुत लेखात केली आहे. त्याचबरोबर कृषी संपन्नतेचे नेमके आधार कोणते आहेत आणि शेती हा ‘व्यापार’ कसा चालतो यावरही या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतीय शेतीकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे असे या लेखातील मुख्य प्रतिपादन आहे.
संशोधन पद्धतीच्या भाषेत प्रस्तुत लेख म्हणजे बर्याच प्रमाणात उक्तवचनी (tautological) आहे, म्हणजे जे आधी म्हटले गेले आहे त्याची पुनर्मांडणी करणारा आहे. त्याला आपण जोड देऊ समावेशकतेची. शेतीचा संबंध मातीच्या प्रश्नापासून, जागतिक व्यापारापासून जीवनाच्या तत्त्वज्ञानापर्यंत आहे. चर्चा करताना एकतर खालून (मातीपासून) वरपर्यंत जाता येते किंवा वरून खाली (मातीपर्यंत) येता येते. आपण समावेशकतेच्या दृष्टीने दुसरी पद्धती स्विकारू. चर्चेत शेतीची सध्याची संवैधानिक, राजकीय, आर्थिक रचना कायम ठेवून तांत्रिक-आर्थिक सुधारांचा विचार करावा लागतोच परंतु दीर्घकालीन पर्यायी व्यवस्थेची चर्चाही उपयुक्त ठरते. अगदी वरपासून सुरूवात करावयाची असल्यामुळे आपण डॉ. रामचंद्र पारनेरकरांनी त्यांच्या पूर्णवादी अर्थशास्त्रात असे म्हटले की व्यक्तीला जोपर्यंत अन्नासाठी मजुरी व गुलामी करावी लागते तोपर्यंत त्याची (अध्यात्मिक इत्यादी) प्रगती होणे दुरापास्त आहे. म्हणून समाजाने अन्नपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारून सगळ्यांना अन्नपुरवठा विनामुल्य दिला पाहिजे. ही सूचना अंमलात येणे किती कठीण आहे ह्याची जाणीव त्यांनासुद्धा होती. कारण शेतीत पिकविलेले धान्य लोकांना मोङ्गत देऊ करणारा शेतकरी समाजजीवनाच्या आवश्यक वस्तू कशा घेणार? इतरांनीही त्या लोकांना आपल्या उत्पादित वस्तू विनामूल्य उपलब्ध करून द्याव्या लागतील. म्हणजे तो समाज नङ्गा, लोभ बाजूला ठेवून वेगळ्याच उद्दिष्टांवर आधारलेला असावा लागेल. तो नजिकच्या काळात निर्माण होईल का नाही, हा काल्पनिक प्रश्न आहे. परंतु ज्या अन्नसुरक्षेची आपण चर्चा करीत आहोत, तिचा विचार कोणताही एक धर्म डोळ्यापुढे न ठेवता मानवी उत्थानाच्या दृष्टीने डॉ. पारनेरकरांनी त्यांच्या पूर्णवादी अर्थशास्त्र ह्या ग्रंथात मांडला होता. तो वैचारिक वारसा म्हणून येथे नमूद केला.
Explanation:
please mark as brainiest