Science, asked by Dhananjaypatil9930, 2 months ago

शेती व्यवस्थापनामध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका महत्वाची का ठरते?​

Answers

Answered by nihaltamboli37
0

Explanation:

उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ जेफ डॅंग्ल म्हणाले की, जीवाणूंची बीज प्रक्रिया ही कृषी क्षेत्रातील ज्ञात असलेली व अनेक वर्षांपासून वापरली जाणारी क्रिया आहे. शेंगावर्गीय पिकामध्ये मुळांवर येणाऱ्या गाठी व ते स्थिर करीत असलेल्या नत्राचा लाभ घेता येतो. त्यामुळे आंतरपीक किंवा फेरपालटासाठी म्हणून तृणधान्य पिकासोबत कडधान्य पिकांची लागवड केली जाते.हवेतील नत्राचे रूपांतर पिकांना उपलब्ध अशा घटकामध्ये करणाऱ्या अतिउष्ण जमिनीमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंचा शोध घेण्याचे काम सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ मारियन फ्रिइसेन करीत आहेत. अशा प्रकारच्या जीवाणूवर फारसे संशोधन झालेले नाही.

एक दशकापूर्वी जर्मन शास्त्रज्ञांनी नत्र स्थिरीकरणामध्ये उपयुक्त ठरू शकतील अशा स्ट्रेप्टोमायसिस थर्मोऍटोट्रोपिक्‍स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सूक्ष्मजीवांविषयी मांडले होते. हे जीवाणू ऑक्‍सिजनच्या उपस्थितीतही नत्र स्थिर करतात. (सामान्यतः ऑक्‍सिजनरहित जीवाणूंची नायट्रोजन खेचणारे एन्झाईम्स विषारी होतात.) सुरवातीच्या संशोधनानंतर त्याविषयी फारसे संशोधन झाले नाही. मात्र, या उष्णतेमध्ये कार्य करणाऱ्या जीवाणूंमध्ये सामान्यतः नत्र स्थिरीकरण न करू शकणाऱ्या पिकासाठी काम करण्याची चांगली क्षमता आहे.

शेतीमध्ये बदल घडविण्याची क्षमता असलेल्या अनेक जीवाणूंपैकी हा एक जीवाणू आहे. अन्य उपयुक्त जीवाणूंचा शोध घेऊन त्यांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जगभरातील विद्यापीठे आणि मुख्य कंपन्या सातत्याने संशोधन करीत आहेत.

hope this information it helps you

Similar questions