शेतावरील सहल' या विषयावर दहा ओळींचा निबंध लिहा.
Answers
Answered by
6
Answer:
यावर्षी आमची सहल गावाबाहेर गंगासागर धरणावर गेली होती. आम्ही सर्व मुले सकाळी बरोबर सात वाजता शाळांमध्ये जमलो. नंतर बस मधून आम्ही धरणावर पोहोचलो. दोन डोंगरांमध्ये पाणी अडवून धरण बांधले होते. धरण पाण्याने पूर्ण भरले होते. अबब ! एवढे मोठे धरण मग बाईंनी आम्हाला धरणाची पूर्ण माहिती सांगितली. नंतर एका मोठ्या झाडाखाली बसून आम्ही सर्वांनी डब्यातील खाऊ खाल्ला. नंतर आम्ही पकडापकडी खेळलो, गाणी म्हटली. वडाच्या पारंब्या धरून झोके घ्यायला तर खूपच मजा आली.
दुपारी आम्ही जवळच्या डोंगरावर फिरायला गेलो. तेथे वड, पिंपळ, साग, कडून अशी मोठी झाली होती. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी होते. माकडे सुद्धा होती. डोंगराच्या उंच टोकावरून लांबवर दिसणारा समुद्र किनारा खूपच सुंदर दिसत होता. फिरता-फिरता संध्याकाळ कधी झाली व दिवस कधी संपला ते आम्हाला कळलेच नाही.
Similar questions