India Languages, asked by alamabdussamad459, 1 year ago

शेतकरी आपला अन्नदाता यावर निबंध

Answers

Answered by gadakhsanket
259
★ शेतकरी - आपला अन्नदाता (निबंध)-

आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८०% लोकांचा उदरनिर्वाह शेती वर अवलंबून आहे. शेतकरी पिकवतो मग आपण खातो. जर या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? कसे जगणार?

एक सामान्य शेतकरी दिवसरात्र शेतात राबतो. काबाडकष्ट करतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधी भयंकर वादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जातो. एवढे कष्ट करूनही त्याच्या धान्याला भाव मिळत नाही. मग नाईलाजाने त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो.

आपल्या या मातृभूमीसाठी, देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. हाच 'आपला अन्नदाता'. परंतु त्याच्या पोटाचे काय ? त्याला दोन वेळचे अन्नही मिळत नाही. यावर आपणच काहीतरी उपाय योजले पाहिजेत.

सरकारने शेतकऱ्यांना कमी कर्जदरात खत, बियाणे, यंत्रणा उपलब्ध करून द्यायला हवी. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल याची सोय करायला हवी. तरच हा शेतकरी आणि आपला देश प्रगती करेल.

'शेतकरी सुखी तर देश सुखी' या उक्तीला आपण मानायला पाहिजे. या अन्नदात्याच्या अन्नासाठी आपण सुद्धा काहीतरी केले पाहिजे.

धन्यवाद...
Answered by tanvihuderi2007
15

Answer:

भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास 22 प्रमुख भाषा व 720 बोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे 17% योगदान आहे.  शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.

भारतीय शेतकऱ्याचे अर्थव्यवस्थेत येवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दयनीय आहे. शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत. काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.

Explanation:

hope this helps mark me brainliest

Similar questions