शेतकरीचे मनोगत write essay on it please help me
Answers
मला ओळखलं का तुम्ही?
मी सगळ्या जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो
बरोबर मला शेतकरी म्हणून ओळखतात सगळे
मी रोजचं पोट भरण्यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करणारा जगाचा पोशिंदा असे वर्णन ज्याचे केले जाते तो शेतकरी आहे.
आजकाल तुम्ही सर्वजण online झाला आहेत, भावना समजून घ्यायला तुमचे मन offline होत चालले आहे.
त्यामुळेच तुम्हाला 'पत्र' लिहीत आहेत कारण पत्र हे कधी भावनाशून्य नसते. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही माझ्या भावना समजून घेताल,.
मी सध्या तरी ठीक आहे असंच म्हणता येईल कारण माझ्या मनात माझा जीव संपवायचा विचार आला नाही. पण तो कधीही येऊ शकतो अशी माझी परिस्थिती आहे.
1995 पासून माझ्या 3,00,000 पेक्षा अधिक बांधवांचे जीव गेले आहेत, याकडे कोणी गंभीरपणे पाहणार आहे का नाही ? कारण आज आमचा मृत्यू होत आहे उद्या या यादीत तुमचेही नाव येऊ शकते.
आताच सावध राहा.
आमच्या ह्या परिस्थितीला खरं तर आम्हीच जबाबदार , कसं काय ?
आम्ही भोळी भाबड़ी अडाणी माणसं. सरकार आणि व्यवस्थेवर आम्ही सहज विश्वास ठेवला आणि आम्ही फसलो गेलो.
सरकारी लोक राजकारणी असतात हे आम्ही विसरलो गेलो, आता कर्जमाफी च्या नावावर आम्हांला फसवण्याचा प्रयत्न होत आहे. कर्जमाफी करून काय होणार ? हा थोडीच शाश्वत पर्याय आहे.
याचा फायदा किती शेतक-यांना होणार ? आम्ही तर सावकाराच्या कर्जाखाली बुडत आहोत.
बँकाही सहकार्य करत नाही. हे झालं सरकारघं.
पण आमचा रोष सरकारवर तर आहे पण त्यापेक्षा अधिक सुशिक्षित सुज्ञ असणा-या तुमच्याकडून आहे.
पण तुम्ही तर या भोगवादी दुनियेत आम्हाला विसरलात. आतापयंत झालं ते झालं. अपेक्षा आहेत ? फक्त आमच्या कामाला तुम्ही प्रतिष्ठा आणि मानसिक बळह काही नको आम्हाला. तैक्हा बघा आम्ही कसं कष्ट करतोत ते.
सध्या आम्ही गण आमच्यात काहीच नाही. आमच्यात प्रोत्साहन देण्याचे छोटेसे काम तुम्ही केले तरी ते आमच्यासाठी आशीर्वाद असल्यासारखे आहे. आता तुम्ही विचारताल 'प्रतिष्ठा' कशी द्यायची ? अगदी सोपं
आहे. एखादा शेतकरी भेटला तर त्याची आपुलकीने विचारपूस करा.
तुम्हाला आमच्या काळजी आहे असे दिसून येते आणि याचे मोल कोणत्याही धनापेक्षा अधिक आहे.
तुम्ही बाजारात खरेदीसाठी आल्यावर २ 1-2 चा भाव कमी करण्यासाठी जे बोलतात त्याने आम्हांला खूप दुःख होते. आम्हांला पैसे कमी मिळाले तरी चालतील पण असे बोलत नका जाऊ.
एया स्वार्थी जगात फक्त तुम्ही आम्हांला मदत करू शकतात. राजकारणी अधिकारी अडती यांच्या साखळीकडून खूप शोषण होते. याचा तोटा आपल्यालाच सहन करावा लागत आहे. शेतक-यांकडून कवडीमोल भावाला खरेदी करतात आणि लिा उच्च भावाला विकले जातात. यावर तुम्ही आवाज का व्यक्त करत नाहीत.
आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. यात आम्ही काहीच करू शकत नाही कारण आम्हांला दोन वेळच्या पोटापाण्यासाठी वकषटी णि त्यातच आमचं आयुष्य निघून जाते. तुम्ही अशावेळी स्वतःहून पुढे येऊन मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करू शकतात. खूप बोलत आहे थांबतो आता. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेतआणि तुम्हीत्या निश्चितपणे पूर्ण करताल.
शेतकरीचे मनोगत
एकदा किसान दिनानिमित्त आमच्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.. या उपक्रमां अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शेतकर्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव ऐकून घ्यायची होते.आम्ही आमच्या सावंत सरांसह शेतकऱ्यांच्या शेतात गेलो. तिथे आम्ही रामदास पाटील नावाच्या एका शेतकऱ्याला भेटलो. त्यांनी आमचे स्वागत केले आणि त्यांचे मनोगत आमच्यासोबत व्यक्त केले.
त्यांच्याशी बोलल्यावर आम्हाला कळले की त्याचे कुटुंब खूप मोठे आहे परंतु ते गरिबीत आहे. त्यानी आम्हाला सांगितले की त्यांनी लहानपणापासूनच वडिलां सोबत शेती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते अभ्यासा पासून विचलित राहिले. शेतात काम करणे, गायी, म्हशींची काळजी घेणे, या सर्व गोष्टी त्यांना आवडत होत्या.
पाऊस होण्यापूर्वी शेतीच्या कामांना सुरुवात होते. पण पावसाच्या सुरूवातीला शेतीची सर्व कामे वाढत असतात. शेतकर्यांसाठी दिवाळीचा सण जितका महत्त्वाचा आहे तितकाच पाऊसदेखील महत्त्वाचा आहे. रामदास पाटील यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली की जर पाऊस चांगला झाला तर शेतात चांगले पीक येते. जर मुसळधार पाऊस पडला तर कधी शेतातल्या उत्पादित धान्याचे नुकसान होते. रामदास पाटील यांच्याकडून आम्हाला कळले की हा शेतीचा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.
रामदास पाटील यांच्या अनुभवावरून आम्हाला हे ही कळले की शेती हा एक व्यवसाय आहे, ज्यामध्ये शेतकरी नि: स्वार्थपणे देशाच्या सेवेसाठी अन्नधान्य उत्पादन करतो आणि आपल्या देशातील सर्व देशवासीयांसाठी धान्य पिकवतो.। शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकर्यांचे बरेच नुकसान होते. यामुळे काही शेतकरीही आत्महत्या देखिल करतात.
रामदास पाटील यांनी आम्हाला सांगितले की त्यांच्या जीवनात बऱ्याच अडचणी असूनही, त्यांना शेतीची आवड आहे आणि शेताला आपली कर्मभूमी समजतात आणि स्वत: ला ते समाधानी व्यक्ती मानतात.
त्याचा अनुभव ऐकून माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा अभिमान वाटला आणि सर्व विद्यार्थ्यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला.
यावरून आपण शिकतो की शेतकरी असणे ही एक सोपी गोष्ट नाही. शेतकर्यांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी खरा देशभक्त आणि भूमातेचा मुलगा आहे म्हणूनच आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬