शेतकरी मराठी निबंध, भाषण, माहिती, लेख | Essay on Farmer in...
Answers
शेतात दिवसरात्र राबून जो धान्य पिकवतो, आपलं पालन पोषण करतो, तो शेतकरी होय. शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून सुद्धा संबोधले जाते. शेतकरी आपल्या समाजाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्यासाठी धान्य पिकवतात. शेतात राबून पिकांची काळजी घेतात. शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व काम स्वतः करून आपले पोट भरतात.
पण आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय. पिकांचे योग्य मूल्य ना मिळाल्यामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आज शेतकरी शेती विकून दुसरे काम करायला विवश झाले आहेत. कोणी युवक शेती करायला मागत नाही.
शेतकरी खरंतर स्वतःचा मालक असतो, पण आजकाल त्याला कर्ज घेऊन सुद्धा फायदा नाही होत.
कृषिप्रधान म्हणून ओळखल्या देशात अशी दशा लाज्यास्पद आहे. शेतकऱ्याला मान व न्याय दोन्ही मिळायला हवे कारण शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे.
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास 22 प्रमुख भाषा व 720 बोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे 17% योगदान आहे. शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.
भारतीय शेतकऱ्याचे अर्थव्यवस्थेत येवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दयनीय आहे. शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत. काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाने त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळवून द्यायला हवा. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण खाद्य निर्यात देशापासून एक खाद्य आयातक देश बनून जाऊ.