शेतकरी नसता तर essay in Marathi
Answers
■■ शेतकरी नसता तर!!■■
आपला "अन्नदाता" शेतकरी, आपल्या समाजामधील सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती आहे. त्याचे व्यवसाय म्हणजेच शेती हे आपल्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहे, कारण त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांना खायला अन्न मिळते.अशा वेळी, शेतकरी नसता तर, हा विचार खूप भयंकर आहे.
शेतकरी नसता तर,लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.शेती करणे जितके सोपे दिसत असते,वास्तवात ते इतके सोपे नसते.
शेतकरी नसल्यावर आपल्याला शेतात दिवस रात्र काम करावे लागेल,तेव्हा जाऊन आपल्याला खायला अन्न मिळेल.
शेतकरी नसता तर,आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार वाईट परिणाम होईल कारण बर्याच कृषी उत्पादनांची निर्यात बाहेरच्या देशांमध्ये केली जाते.
शेतकरी केवळ खाता येईल अशी पिके पिकवत नाही,तर तो विविध उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जाणारे पिके तयार करतो.शेतकरी नसता तर, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पीके कुठून मिळणार?
शेतकऱ्याचे काम खूप मेहनतीचे व कठीण असते.अशा वेळी,शेतकरी नसता तर, हा विचारच आपण करायला नको.