India Languages, asked by sarawadepradeep21, 6 months ago

शेतकरी स्त्रियांचे कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा​

Answers

Answered by keshav2150
57

आपल्या समाजात जातीच्या उतरंडीमध्ये तळाच्या जाती अगदीच दुर्बल, वंचित राहिल्या. अशा जातीतल्या स्त्रिया त्याहूनही पिचलेल्या. या स्तरातल्या कष्टकरी, गरीब, असंघटित स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन ‘सेवा’ने त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केला. या स्त्रिया कोण होत्या तर दिवसभर कष्ट करून कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणाऱ्या, भरतकाम करणाऱ्या, जंगलात जाऊन डिंक गोळा करणाऱ्या, मिठागरांमध्ये मीठ बनवणाऱ्या स्त्रिया. दिवसभर राब-राबून त्यांना जेमतेम दहा रुपयेही मिळत नसत. त्यांच्या कष्टांवर वरचे व्यापारी गब्बर होत. कारण या स्त्रियांना लिहिता-वाचता येत नसे, त्यांना वेगवेगळे सरकारी परवाने मिळवणं जमत नसे आणि मुख्य म्हणजे त्या पूर्णपणे असंघटित असत. ‘सेवा’ने जगाला त्यांच्या कष्टांची दखल घ्यायला लावली. त्या कष्टांचा या स्त्रियांना योग्य दर मिळावा यासाठी वेळोवेळी त्यांना संघर्ष करायला लावला. या प्रक्रियेत वेळोवेळी आलेल्या मोठय़ा अडचणींतही ‘सेवा’ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. या सगळ्या प्रक्रियेत कष्टांशिवाय दुसरं काहीही माहीत नसलेल्या या स्त्रियांचं आयुष्य कसं बदललं, याचा आलेखच हे पुस्तक मांडतं. तेही वेगवेगळे व्यवसाय त्यात काम करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्यापुढचे प्रश्न, ‘सेवा’शी संपर्क आल्यानंतर प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा बदललेला दृष्टिकोन आणि या सगळ्या प्रक्रियेत झालेलं त्यांचं सक्षमीकरण हे मुळातून वाचण्यासारखं आहे.

Answered by rajraaz85
19

Answer:

कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीत या कवितेतील सदर ओळी आहेत.

शेतामध्ये रात्रंदिवस राबत असताना शेतकरी महिलेचे जीवन कसे असते याचे वर्णन कवितेने या कवितेतून केलेले आहे. कवितेच्या माध्यमातून कवयित्री सांगतात की शेतात काम करत असताना स्त्रियांना कुठल्याही प्रकारे वाईट वाटत नसून अगदी अभिमानाने व जिव्हाळ्याने ते शेतामध्ये काम करत असतात.

काम करत असताना शेतातील पीक हे जणू त्यांच्या जीवनातील अविभाज्य भागच आहे असे ते मानतात. शेतामध्ये कांदे लावत असताना तसेच काळ्याभोर जमिनीला हिरवा गार करत असताना आपला जीव त्याच्यात या स्त्रिया होतात व रात्रंदिवस जमिनीची मशागत करतात. कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची अपेक्षा न करता शेतातील पीक हे जणू आपल्या शरीराचा भाग आहे असे मानतात.

Similar questions