Math, asked by harshitjain26102005, 8 months ago

शेतकर्याचे मनोगत मराठी​

Answers

Answered by renisingh2009
16

Answer:

शेतकऱ्याचे आत्मवृत्त :-

मी एक कोरडवाहू शेतकरी आहे. पावसाच्या पाण्यावर माझी शेती अवलंबून असते. पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब मी उपयोगात आणतो. माझे कुटुंब छोटे आहे मी, माझी पत्नी आणि दोन मुले. माझी दोन्ही मुले शाळेत जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूप कष्ट करतो.

हा कधी पाऊस रुसतो, अजिबात पडत नाही. कधी खूप कोसळतो. कधी अवेळी पडतो. कधी केलेली पेरणी फुकट जाते. तर कधी तयार झालेले पीक पाण्यात वाहून जाते वा कुजते. या साऱ्या संकटांचा सामना करायला आम्ही आता शिकलो आहोत. पण जेव्हा पाऊस वेळेवर व हवा तेवढाच पडतो, तेव्हा आमचे शेत फुलून येते.पिकवलेले धान्य घरात आले की माझे मन तृप्त होते. हीच आम्हां शेतकऱ्यांची श्रीमंती. मी नेहमी आलटून-पालटून वेगवेगळी पिके घेतो, त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. शेताबरोबर मी छोटासा मळाही फुलवतो. मळ्यातील फळे, फुले विकून मला घरखर्चाला पैसा मिळतो. नेहमी पीक देणारी चिंच, नारळ अशी काही झाडेही मी लावली आहेत.

शेतात एखादे पीक खूप आले की पिकाचे भाव पडतात. शेतकऱ्याचे नुकसान होते. पिकावर रोग पडू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधे फवारावी लागतात. मला माझ्या काळ्या आईची सेवा करण्यात खरोखर धन्यता वाटते.

वरील निबंध इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकरता मराठी या विषयाच्या निबंध लेखनाला उपयुक्त असून निश्चितच त्यांना मार्गदर्शक ठरेल हा निबंध वाचल्यानंतर तुम्हाला जर काही आणखी मुद्दे नमूद करायचे असतील किंवा माहिती विस्तार करायचा असेल तर तुम्ही निश्चितच आम्हाला कमेंट करा तुमच्या प्रतिक्रियांमध्ये सांगितलेले सुचवलेले विचार मार्गदर्शन निश्चितच निबंधामध्ये समाविष्ट करून निबंधाचा लेखन विस्तार करणार तसेच तुमच्या मित्रांसोबत हा निबंध शेअर करायला विसरू नका

Similar questions