Hindi, asked by swapnilkarad, 11 months ago

- 'शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे' हा विचार तुमच्या शब्दांत सुमारे 12 ते 15 ओळीत लिहा.
किंता​

Answers

Answered by mad210216
57

"शेतकऱ्यांचे जीवन"

Explanation:

  • शेतकरी आपला अन्नदाता असतो आणि तो आपल्यासाठी खूप कष्ट करून शेतात अन्न पिकवत असतो.
  • ऊन असो की पाऊस, थंडी असो किंवा उन्हाळा, दिवस असो की रात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकरी त्याच्या शेतात राबत असतो.
  • शेतकऱ्याचे ध्येय म्हणजेच अन्न पिकवण्यासाठी तो शेतात घाम गाळत असतो. अन्न पिकवण्यासाठी त्याला खूप कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागते.
  • कधीकधी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्याला कर्ज घ्यावे लागते, कधीकधी पीकांसाठी आवश्यक असलेले पावसाचे आगमन होतच नाही, तर कधी पाऊस जास्त प्रमाणात पडतो, त्यामुळे पीकांची नासाडी होते आणि शेतकऱ्याचे कष्ट वाया जातात.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांसाठी योग्य तो भाव मिळत नाही. कधीकधी तो कर्जबाजारी होतो किंवा इतर आर्थिक समस्यांनी ग्रासलेला असतो.
  • तेव्हा, काही शेतकरी आशा सोडून देतात व आत्महत्येचा पर्याय निवडतात. खरंच, शेतकऱ्यांचे आयुष्य हे कष्टदायी असते.
Similar questions