शेतकऱ्यांचे स्वप्न वर निबंध लिहा.
Answers
Explanation:
भारतात सर्वात अभागी जीव म्हणजे शेतकरी. तो सर्वांना अन्न पुरवितो मात्र स्वतः कुपोषित असतो. वस्त्रासाठी कापूस पिकवितो पण त्याला अंगभर कपडे नसतात. ऊन,पाऊस,वारा, थंडी याची पर्वा न करता शेतात राबतो परंतु त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला त्याला मिळत नाही. लाखो रुपयाच्या शेतीचा तो मालक असतो परंतु वेळ प्रसंगी खिशात रुपया नसतो. वर्षानुवर्ष कर्ज घ्यायची त्याला गरज पडते. कर्जासाठी बँकेत व सावकाराच्या घरी चकरा मारुन दमतो तेव्हा त्याच्या यातना त्याला आत्महत्येस प्रवृत्त करत असतात.
भारतीय शेतकरी हा शेतमालाचा केवळ उत्पादक आहे. त्याला शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. पुढील काही ओळीतून त्याची स्थिती स्पष्ट होते.
राबून राबून रात्रं दिनी घाम गाळुनी
शेतकरी पिकवूनी आणी बाजारी
भाव मात्र त्या मालाचा ठरवीत असतो व्यापारी
त्यामुळे भारतीय शेतकरी हा पिढ्यान पिढ्या दरिद्री असतो. परंतु याच शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी मात्र श्रीमंत होत असतो. कोणताही घाम न गाळता, कोणतेही कष्ट न करता. त्यामुळे भारतीय व्यापारी वर्ग हा शेतकऱ्यांना छळणारा ठरत आहे.शेतकऱ्यांना छळणारा आणखी एक वर्ग म्हणजे बियाणे कंपन्या तथा कीटक नाशके व खतांच्या कंपन्या. ह्या सर्व कंपन्यांच्या सर्व उत्पादनाचे भाव सतत वर वर चढत असतात. शेतकऱ्यांजवळून मातीमोल किमतीने घेतलेल्या पिकांवर प्रक्रिया करुन सोन्याच्या भावाने बियाणे विकल्या जाते.
Answer:
ह्या सर्व कंपन्यांच्या सर्व उत्पादनाचे भाव सतत वर वर चढत असतात.
Explanation:
i hope its help you