History, asked by laxmisolaskar5258, 1 month ago


१) शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण लिहा.

Answers

Answered by nandini5414
8

Explanation:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे धोरण होते. शिवकालात प्रत्यक्ष शेतात राबणारा रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता व त्याचा व्यवसाय हा समाजातील महत्वाचा मानला जात होता कारण त्याचे उत्पन्न हेच राज्याचे उत्पन्न होते तसेच शेतकऱ्यांच्या युवा पिढीतून सैन्य मिळत असे म्हणून शिवाजी महाराजांनी शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. त्यासाठी शिवाजी महाराजांनी जमिनीची योग्य प्रकारे मोजमाप करून त्या त्या मातीप्रमाणे जमिनीचे प्रकार करत वर्गवारी करून त्यावर पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली होती आणि त्यावरच सारा आकारला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्यां संदर्भात अनेक प्रकारच्या योजना आणि सवलती राबवल्या होत्या त्या त्यांच्या काही पत्रांमधून आपल्याला समजते त्यातील काही सोई सवलती अशा

● ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.

● शेतकर्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.

● गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी

.● नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.

● ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.

शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.

Answered by Shreyaphadkale
6

Answer:

Your question answer

Explanation:

Marks mi brainliest

Attachments:
Similar questions