शिवाजी महाराजानी कोणती प्रेरणा मावी पिढ्याना आदर्श राहील ?
Answers
Explanation:
१) शिवाजीमहाराज हे कर्तृत्ववान राजे होते, लहान असल्यापासूनच त्यांनी पराक्रम गाजवून अनेक किल्ले काबीज केले.
२) त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी आरमार उभारून समुद्रावर राज्य करण्याचे स्वप्न पहिले. आणि शत्रू सैनिकांची नाकेबंदी केली.
३) ते एक प्रजाहितदक्ष राजे होते, कोणावरही अन्याय होऊ नये हि त्यांची भावना होती.
४) महिलांचा त्यांनी नेहमी सम्मान केला.
५) ते सर्वांची सहिष्णू भावनेने राहिले, त्यांना रयतेचा राजा म्हणून ओळखले जाते.
Answer:
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाने कौतुक करावे, असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, सर्वांना आपलेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा आज पुण्यदिन आहे. शिवाजी महाराजांचे केवळ नाव ऐकले, घेतले तरी अभिमान वाटतो, गर्वाने मान ताठ होते. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे, ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. शिवाजी महाराज नेहमी 'रयतेचं स्वराज्य' असाच शब्द वापरत. स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांचे जीवन एका आख्यायिकेप्रमाणेच असल्याचे भासते. अशा शिवाजी महाराजांच्या यशाची अष्टसुत्री काय होती, जाणून घेऊया...