History, asked by seehbk, 1 month ago

शिवाजी महाराज व अफजलखान भेटीच्या प्रसंगाचे वर्णन कर.

Answers

Answered by XxMissSinglexX
3

Answer:

  • प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.

  • शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले, पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली.
Answered by manasi3151
2

भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियानेत पोहोचला.शामियाना मोठा होता. निःशस्त्र भेटायचे असे ठरले होते. तरी ही अफजलखानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती. अफजल खान काही कट कारस्थान करून घात पात करेल ह्याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता. म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले ,जिरेटोप खाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपविली होती.दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले. अफजल खानाची उंचीपुरी देहयष्टी होती तरी ही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले. शिवरायांना बघून या शिवबा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. अफजल खान ने त्यांना आपल्या बाहुपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी पासून सावध होते. अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याचं बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा आपल्या बुद्धी कोशल्यतेने वध केला. अफजलखानाने "दगा दगा" म्हणत आकांत केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद आत आला अफजल खान ला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला. तो पर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्या वर मागून हल्ला करून सय्यद ला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा "असे म्हणतात. झाडीत लपलेल्या सर्व मावळांनी अफजलखानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले. इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते.

Similar questions