India Languages, asked by apritam4099, 1 year ago

शिव जयंती निम्मीत मराठीतून भाषण
Speech on Shiv Jayanti in Marathi

Answers

Answered by MuditKumar786
12

This is your answer and also use google

Attachments:
Answered by Mandar17
21

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये पुण्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले विजापूरच्या राजाच्या सेवेमध्ये जहागीरदार होते.  

छत्रपती शिवाजी महाराज भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. मुस्लिम शासनानंतर हिंदू साम्राज्याची स्थापना करणारे पहिले हिंदू राजे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव होते.ते दादोजीमुळे लहान वयातच युद्धकोशल्यात पारंगत झाले होते .  त्यांची आई जिजा बाई अतिशय पवित्र स्त्री होत्या .  छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईकडून उत्तम गुण व संस्कार मिळाले . जेव्हा दादोजी  त्यांना  रामायण आणि महाभारत कथा सांगत असत. तेव्हा त्यांच्या मनात स्वराजयाविषयी काळजी घर निर्माण करत असे .

हिंदूंवर मुघल  राजांच्या क्रूर कृत्येच्या कथांवर मोठा प्रभाव त्यांच्यावर  पडला. त्यांनी  मुघलांच्या क्रूर हातांपासून आपल्या देशाला मुक्त करण्याचे धोरण आखले आणि लहान सैन्याच्या मदतीने त्यांनी आपले काम सुरू केले.

त्यांनी प्रथम “हर हर महादेवची गर्जना “करत ‘तोरणा’ किल्ला काबिज केला . आणि मजल दरमजल करत त्यांनी अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले. अखेर विजापुरच्या राजाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी अफझल खान नावाचा अधिकारी नेमला.

मात्र अफजल खानला आपल्या वाघ नखाने ठार केले आणि विजापुरच्या सैन्याचा नाश केला. आणि स्वराज्य निर्मितीत आणखी एक पराक्रम नोंदवला.

त्यानंतर औरंगजेबाशी महाराजांनी अनेक लढाया करून त्यांनी औरंगजेबकडून अनेक किल्ले परत मिळवले . त्यानंतर ६ जून १९७४ मध्ये राज्याभिषेक करून त्यांनी स्वताला स्वराज्याचा राजा घोषित केले.  

६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।

अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

Similar questions