श्वास घेणे व उच्छवास सोडणे यास काय म्हणतात ?
Answers
Answer:
अनेकांना रात्री झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो. पण हे नेमकं कशामुळे होतं याकडे कुणी फार लक्ष देत नाहीत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. काही लोकांची या समस्येमुळे रात्रीची झोप उडते. जर वेळीच यावर उपाय केले नाही तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. रात्री झोपेत श्वास घेण्यास अडचण येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चिंता, मानसिक समस्या, तणाव, धावपळीची जीवनशैली इत्यादी
काय असतात कारणे?
शहरं
झोपेत श्वास घेण्यास त्रास का होतो? जाणून लक्षणे आणि कारणे....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 10:03 AM
अनेकांना रात्री झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो. पण हे नेमकं कशामुळे होतं याकडे कुणी फार लक्ष देत नाहीत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं.
झोपेत श्वास घेण्यास त्रास का होतो? जाणून लक्षणे आणि कारणे....
(Image Credit : medicalnewstoday.com)
अनेकांना रात्री झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो. पण हे नेमकं कशामुळे होतं याकडे कुणी फार लक्ष देत नाहीत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. काही लोकांची या समस्येमुळे रात्रीची झोप उडते. जर वेळीच यावर उपाय केले नाही तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. रात्री झोपेत श्वास घेण्यास अडचण येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चिंता, मानसिक समस्या, तणाव, धावपळीची जीवनशैली इत्यादी.
काय असतात कार
जर तुम्हाला एखाद्या प्रकारची चिंता असेल तर, भिती, घोरण्याची समस्या, रेस्पिरेटरीसंबंधी संक्रमण, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज, स्लीप एप्निया इत्यादी कारणांमुळे रात्री झोपेत श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. वजन जास्त असल्याने देखील ही समस्या होऊ शकते. जास्त वजनामुळे फुप्फुस आणि डायफ्रामवर दबाव पडतो. अनेकदा हृदयासंबंधी गंभीर आजार झाल्याने किंवा हृदयाच्या नसांवर दबाव आल्याने किंवा हार्ट अटॅकच्या लक्षणांमुळेही श्वास घेण्यास त्रास होतो.
काय असू शकतात लक्षणे
झोप न येणे
दिवसभर थकवा जाणवणे
घोरणे
सकाळी उठल्यावर डोकं दुखणे
जुना खोकला
काम करताना श्वास घेण्यास त्रास
छातीत इन्फेक्शन
छातीत वेदना होणे
हात किंवा खांद्यात वेदना होणे
वेगाने श्वास घेणे
हार्ट रेटचा वेग वाढणे
चक्कर येणे
काय करू शकता उपाय?
1) रेस्पिरेटरी इन्फेक्शनची समस्या झाल्यावर लगेच डॉक्टरांना भेटा. यावर उपचारासाठी डॉक्टर तुम्हाला अॅंटी-बायोटिक्स किंवा अॅंटी वायरल औषधे देऊ शकतात.
२) वजन जास्त असेल तर एका दिवसात कमी केलं जाऊ शकत नाही. अशात तुम्ही रात्री पाठीवर झोपण्याऐवीज एका कुसेवर झोपा. असं केल्याने फुप्फुसावर अतिरिक्त दबाव येणार नाही. वजन कमी करण्यासाठी नियमित एक्सरसाइज, वर्कआउट आणि डाएट फॉलो करा.
३) क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीजची समस्या एक क्रॉनिक फुप्फुसाचा आजार आहे. यात श्वास नलिका आकुंचन पावतात आणि त्यावर सूजही येते. जर तुम्हाला सीओपीडी असेल तर सुद्धा रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ही लक्षणे कमी करण्यासाठी नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा.
४) स्लीप एप्नियामध्ये झोपताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. स्लीप एप्निया झोपेसंबंधी एक गंभीर समस्या आहे. यात झोपेदरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. तणावामुळेही श्वास घेण्यास अडचण येते. त्यामुळे आधी तणाव दूर करा.