शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणत्या परकीयांचे साम्राज्य होते ?
Answers
Answer:
मराठा साम्राज्य किंवा मराठा संघराज्य ही अशी शक्ती होती जी भारतीयांच्या मोठ्या भागावर अधिराज्य गाजवते ... मराठे त्यांच्या पराभवापर्यंतरपर्यंत भारतातील अग्रणी सत्ता राहिले ...
Answer:
काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या.शतकातील ‘पाल’ हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय.
Explanation:
या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या.शतकातील ‘पाल’ हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर-प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनोज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनोज पासून रामेश्वरपर्यंत पसरली. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. शिलाहारांची तीन घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवर राज्य करत होते. शिवपूर्वकाळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ताविस्तार केला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला