५) शिवरायांनी आरमारात कोणकोणते महत्वाचे बदल केले ?
Answers
Answer:
शिवाजी महाराजांचे आरमार कल्याणला होते. त्यांची आरमारी जहाजे ठाणे खाडीतूनच दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत जात-येत होती. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ठाणे नगरीला झाला आहे की नाही, असा प्रश्न अनेकजण मला विचारत असतात. इतिहासाला जर तर असे उत्तर देता येत नाही. शिवाजी महाराजांचे ठाणे नगरीत पाऊल ठेवण्याबद्दल कोणताही ठोस वा लिखित पुरावा अद्यापतरी उपलब्ध झालेला नाही. ठाण्याची खाडी हा प्राचीन जलमार्ग म्हणजे अगदी हमरस्ताच. या रस्त्याच्या कडेला असलेल्या अनोळखी घरांमध्ये कारण असल्याशिवाय कोण घुसेल? प्राचीन काळातील युद्धनिती शिवकाळात बदलू लागली होती. असे जरी असले तरी एकमेकांच्या सीमांचे रक्षण, तहनामे वा सामंजस्य करार एकमेकांच्या संमतीने होत असत.
आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श ठाणे नगरीला झाला की नाही, याबाबत इतिहास मूग गिळून आहे, परंतु कल्याणला खाडीकिनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी जातीने हा सारा खाडी प्रदेश पालथा घातला असला पाहिजे. कारण नियोजनपूर्ण कार्य करण्याची शिवरायांची हातोटी लोकविलक्षण होती. मुख्य म्हणजे त्यांना आपल्या राज्याची सीमा आणि शत्रूच्या भौगोलिक स्थानाची अचूक माहिती होती. महाराजांचे हेर खाते अतिशय दक्ष होते. त्यामुळे मग अफझलखानाचा वध असो, पन्हाळगडाचा वेढा असो, लाल महालात शाहिस्तेखानाची फजिती केलेली असो, आग्राहून सुटका असो, किंवा दोन वेळा सुरतेची बेसुरत करून स्वराज्यात आणलेली बेसुमार संपत्ती असो वा दक्षिणदिग्विजय असो. या सर्व ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्वक योजना आखून प्रसंगी स्वत:चा जीव पणाला लावून कार्य तडीस नेले आहे. २४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण जिंकल्यानंतर साष्टी उर्फ ठाणे परिसरातील समुद्रातून आत येणारे खाडीमार्ग त्यांनी अभ्यासपूर्वक पाहिले. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या दर्यावर्दी पोर्तुगीजांच्या वखारी त्यावेळी ठाण्याच्या खाडीकिनारी होत्या. वखारीच्या आडोशाने त्यांनी स्वतंत्रपणे कोटकिल्ले बांधून हातपाय पसरविण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज व इंग्रज या बेरकी व धूर्त लोकांचा अंतस्थ हेतू दूरदर्शीपणे हेरला आणि कल्याण खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून आरमारी जहाजांचा कारखाना सुरू केला. या गोदीतून तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तीरकाठी, मचवा, पाल, संगमिऱ्या आणि फत्तेमाऱ्या अशा निरनिराळ्या आकाराची लढाऊ जहाजे तयार होऊ लागली.
कल्याणबरोबरच भिवंडीही स्वराज्यात दाखल झाली. भिवंडी म्हणजे वस्त्रोद्योगाची पंढरी. प्राचीन काळापासून हातमागावर तयार झालेला तलम कपडा जलमार्ग व खुष्कीच्या मार्गाने भारताच्या कानाकोपऱ्यात जात असे, शिवाय शेतीविषयक अवजारांच्या निर्मितीमुळे येथून देश विदेशाशी व्यापार होऊन भिवंडी शहर भरभराटीला आले होते. भिवंडीला कामवारी खाडी वळसा मारून नागला कोटाजवळ ठाण्याच्या खाडीला मिळत असल्यामुळे शिवाजी महाराजांनी भिवंडीच्या रक्षणासाठी भिवंडीच्या भुई कोटाजवळ जहाजांचा काफिला तैनात करून त्यांची देखभाल व दुरुस्तीही भिवंडीच्या बंदरात सुरू केली. याची माहिती १६ ऑगस्ट १६५९ रोजी फ्रॅन्सिस्को-द-मेलो-ए-कस्ट्रो आणि अँटोनिया-डी-सोझा कुतिन्हो या ठाणे-वसईच्या गव्हर्नरांनी आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आदिलशहाचा सरदार शहाजी याच्या मुलाने वसई, चौलजवळचा प्रदेश जिंकला असून कल्याण, भिवंडी, पनवेल येथे आरमार व सैन्य सजविले आहे. म्हणून आम्ही आमच्या कप्तानांना हुकूम देऊन ठेवला आहे की त्यांच्या गलबतांना अटकाव करा.' शिवाजी महाराजांची आरमारी जहाजे ही अरुंद व नालेचा भाग लांबलचक निमुळता असल्यामुळे पाणी सहजपणे कापीत चपलतेने पुढे जात. वेगवान हालचाली हे आरमाराचे वैशिष्ट्ये. त्याबद्दल १ नोव्हेंबर १६७९ रोजी इंग्रज कप्तान मुंबईच्या गव्हर्नरला लिहितो, 'शत्रूची (शिवाजी महाराजांची) गॅलव्हेटस आमच्या समोरून सहज निघून जातात. आमच्या शक्ती त्यांच्यापुढे चालत नाही, कारण या लहानशा होड्या आम्हाला सहज व आश्चर्यकारकपणे चकवतात